दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक गाजर दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना गाजर खाण्याचे फायदे जाणून घेणे हा आहे. आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा करण्यामागील महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
गाजरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे फायदे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय गाजर दिवस म्हणून साजरा केला जातो. गाजर दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना गाजर खाण्याचे फायदे जाणून घेणे हा आहे. हा दिवस २००३ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. गाजरातील पौष्टिक मूल्य महत्त्वाचे आहे.त्याचा प्रचार व प्रसार कण्यासाठी आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा केला जातो. त्यामुळे गाजर खाल्याने आपल्या शरीराला काय मिळते हे जाणून घेऊया.
डोळ्यांसाठी फायदेशीर:
गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए आणि अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन ही दोन कॅरोटीनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. पण गाजरात फक्त एकच नाही तर अनेक पोषक तत्व असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. गाजरात आढळणारे अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहे.
शरीरातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरते :
गाजरात भरपूर फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, मधुमेही रुग्ण आरामात गाजर खाऊ शकतात.
वजनावर नियंत्रण राहते:
गाजराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात ८८ टक्के पाणी असते. त्यात फायबर असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय, जर तुम्ही दररोज एक गाजर खाल्ले तर तुम्ही सुमारे ८० टक्के कॅलरीज वापरता, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. ही भाजी वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बीपीचा त्रास नियंत्रणात आणण्यास मदत :
जर तुमचा बीपी जास्त असेल तर तुम्ही दररोज १ गाजर खावे. गाजरात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते. तसेच शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवते. त्यामुळे बीपी नियंत्रणात राहते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही गाजर खूप चांगले आहे.
आंतरराष्ट्रीय गाजर दिनाचे महत्त्व :
आंतरराष्ट्रीय गाजर दिन साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या पौष्टिकतेनेयुक्त भाजीचे जास्तीत जास्त सेवन करणे हे आहे. गाजराचे वैशिष्ट्य असे आहे की आपण याचा वापर बहुतेक भाज्या, पदार्थ बनवताना करु शकतो. दुपारच्या जेवणासाठी बनवलेली मिक्स भाजी असो किंवा रात्रीच्या जेवणानंतर डेझर्टमध्ये दिलेला हलवा असो, गाजर कोणत्याही स्वरूपात आवडीने खाऊ शकतो. अनेकांना गाजर सलाद मध्ये खायला आवडते.
आणखी वाचा :
Health Tips : निरोगी जीवन जगायचं असेल तर,किमान 30 मिनिटे चालायलाच पाहिजे
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार मालामाल; जीएसटी संकलनात दुसरा सर्वात मोठा विक्रम
सातत्याने पोट बिघडतेय? असू शकतात या Cancer ची लक्षणे, वेळीच सावध व्हा