Natural Face Pack : काचेसारखा चमकदार व नितळ चेहरा हवाय? मग काकडीमध्ये मिक्स करा या गोष्टी

Beauty Tips : नितळ आणि तजेलदार त्वचेसाठी घरच्या घरी काकडीचे फेस पॅक कसे तयार करावे? जाणून घेऊया सविस्तर…

Harshada Shirsekar | Published : Oct 20, 2023 9:06 AM IST / Updated: Oct 26 2023, 10:53 PM IST

18
त्वचेसाठी नैसर्गिक उपाय (Natural Remedies For Skin)

चेहऱ्याची त्वचा डागविरहित, सुंदर, नितळ व चमकदार असावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळीही महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा समावेश असल्याने त्वचेला (Beauty Tips News) फायदे मिळण्याऐवजी त्वचेचं नुकसानच अधिक होते.

(पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय)

28
घरच्या घरी तयार करा फेस पॅक (Homemade Face Pack)

त्वचेला दीर्घकाळासाठी फायदे मिळावेत, यासाठी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये नैसर्गिक सामग्रींपासून तयार केलेल्या फेस पॅकचा समावेश करावा. चेहऱ्याची त्वचा नितळ व सुंदर दिसावी, याकरिता आपण थंडगार काकडीचे फेस पॅक वापरू शकता. घरच्या घरी फेस पॅक (Best Face Pack For Glowing Skin Natural) कसे तयार करायचे? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

38
कोरफड आणि काकडीचे फेस पॅक (Aloe Vera And Cucumber Face Pack)

अर्धा वाटी किसलेल्या काकडीमध्ये एक चमचा कोरफडीचा गर मिक्स करा. दोन्ही सामग्री व्यवस्थित एकजीव करा. पॅक तयार झाल्यानंतर चेहरा व मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा.

(Belly Fat Loss : बेली फॅट कमी करायचंय? मग या 3 आसनांचा नियमित करा सराव)

48
फेस पॅकमुळे मिळणारे लाभ (Face Pack Benefits)

काकडीतील गुणधर्म त्वचेसाठी अतिशय लाभदायक आहेत. यामधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अन्य अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेला मॉइश्चराइझर मिळते. याव्यतिरिक्त टॅनिंगचीही समस्या कमी होऊ शकते. काकडीचा आपण टोनर, लोशनप्रमाणेही वापर करू शकता. काकडीतील औषधी गुणधर्मामुळे सनबर्नची समस्या कमी होण्यास तसंच त्वचेवर जमा झालेल्या विषारी घटकांचा थरही कमी होण्यास मदत मिळते. तर कोरफडमध्ये अँटी- एजिंग आणि मॉइश्चराइझिंगचे गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो.

58
काकडी आणि कच्च्या दुधाचे फेस पॅक (Cucumber And Raw Milk Face Pack)

किसलेल्या काकडीमध्ये एक चमचा कच्चे दूध मिक्स करा. फेस पॅक तयार (how to use cucumber on face) झाल्यानंतर ते चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. 

(दररोज खा एक वाटी दही, शरीराला मिळतील हे लाभ)

68
त्वचा होते मऊ

दुधामुळे त्वचा चमकदार व फ्रेश राहण्यास मदत मिळू शकते. दुधामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांची समस्या (Cucumber face pack for pimples) दूर करू शकतात. यासाठी फेसपॅकमध्ये कच्च्या दुधाचा समावेश करावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, सनटॅन, मुरुम इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळते. विशेष म्हणजे त्वचा हायड्रेट राहते.

78
काकडी व मुलतानी माती फेस पॅक (Cucumber and Multani Mitti Face Pack)

एका वाटीमध्ये किसलेली काकडी (दोन चमचे) (cucumber face pack benefits) आणि दोन मोठे चमचे मुलतानी माती एकत्रित घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर 15 मिनिटांसाठी चेहरा व मानेवर लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. काकडी व मुलतानी मातीतील औषधी गुणधर्मामुळे तेलकट त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळेल. मुलतानी मातीमुळे त्वचेला पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यासही मदत मिळेल.

NOTE : वरील सर्व उपाय करण्यापूर्वी खबरदारी म्हणून पॅच टेस्ट करून घ्यावी. त्वचा लाल झाल्यास किंवा त्वचेला खाज येत असल्यास फेस पॅक वापरणे टाळावे.

88
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos