दररोज खा एक वाटी दही, शरीराला मिळतील हे लाभ
नियमित एक वाटी दही खाल्ल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात. दह्यामध्ये कॅल्शिअम अधिक प्रमाणात असते, जे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.
दह्याच्या सेवनामुळे शरीराची चयापचयाची क्षमता देखील सुधारते. आणखी कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया सविस्तर...
दह्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर सहजरित्या फेकले जातात. शरीराच्या पचनप्रक्रियेचे कार्य सुरळीत सुरू ठेवायचे असेल तर दह्याचे नियमित सेवन करा.
दह्यामध्ये शरीरास पोषक असणाऱ्या बॅक्टेरियांचा समावेश असतो. जे पोटातील हानिकारक बॅक्टेरियांचा खात्मा करतात व चयापचयाची क्षमता वाढवतात. यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
दह्यातील औषधी गुणधर्मांमुळे केसांचेही आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. काही जण दह्याचा हेअर केअर रुटीनमध्येही समावेश करतात.
दह्यामध्ये अशा कित्येक गुणधर्मांचा समावेश असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. ज्यामुळे कित्येक आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
दह्यातील पोषणतत्त्व त्वचेसाठीही लाभदायक असतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या कमी होऊन त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.