डोक्याच्या त्वचेला ‘स्कॅल्प’ असे म्हणतात. डोक्याची त्वचा जेव्हा कोरडी होते, तेव्हा अशा परिस्थितीस ‘ड्राय स्कॅल्प’ (dry, itchy scalp treatment at home) असे म्हटले जाते. स्कॅल्पवरील सीबम म्हणजे नैसर्गिकरित्या होणाऱ्या तेलाचा स्त्राव कमी होऊ लागतो, त्यावेळेस कोंड्यामुळेही स्कॅल्प कोरडे होऊ शकते. याव्यतिरिक्त त्वचेतील ओलावा देखील कमी झाल्यास डोक्याची त्वचा कोरडी होते. हवामानातील बदलामुळेही डोक्याच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतात.