आंध्र प्रदेशात अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते होळी, पुरुष महिलांप्रमाणे साज करत साजरा करतात सण

आंध्र प्रदेशतील कुरनूल जिल्ह्यात प्रत्येक वर्षी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीवेळी अशी मान्यता आहे की, पुरुष देवी रति आणि भगवान मनमाथा यांच्या प्रार्थनेसाठी पुरुष मंडळी स्वत: महिलांप्रमाणे सजतात.

Holi 2024 : आंध्र प्रदेशतील (Andhra Pradesh) कुरनूल जिल्ह्यातील होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. कुरनूल जिल्ह्यातील अडोनी मंडलच्या सांथेकुडलूर गावात होळीवेळी पुरुष मंडळी महिलांप्रमाणे साज करतात. कारण, प्रेमाची देवता मनमथा आणि त्यांची पत्नी रतिची होळीवेळी पूजा केली जाते. खरंतर तेलुगु सिनेमातील 'जंबालाकिडी पंबा' ची आठवण करून देणारी परंपरा होळीवेळी आंध्र प्रदेशात पार पाडली जाते.

परंपरेचे होळीवेळी केले जाते पालन
देशभरात होळीच्या वेळी रंगांची मुक्तपणे उधळण केली जाते. पण संथेकुडलूर येथे परंपरेचे पालन करत शिक्षित व्यक्तींसह समाजातील प्रत्येकाचा वाटा होळीवेळी दिसून येतो. आंध्र प्रदेशात होळीचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. याची सुरूवात 'काम दहनम' पासून होते. असे मानले जाते की, होळीच्या दिवशी पुरुष दुर्भाग्य दूर करण्यासाठी साडी नेसतात. याशिवाय देवी रति-मनमथा यांची पूजा केली जाते.

या कारणास्तव पुरुष मंडळी परिधान करतात साडी
आंध्र प्रदेशतीलल होळीवेळी पुरुष मंडळी आपले वाईट नशीब दूर करण्यासाठी साडी परिधान करतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या गावात होळीच्या सणावेळी बहुतांश पुरुष महिलांच्या रुपात दिसतात. खरंतर, गावात दीर्घकाळापासून ही प्रथा पिढ्यान् पिढ्या सुरू आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील होळीच्या अनोख्या परंपरेवेळी समाजातील सर्व वर्गाची उपस्थिती दिसून येते. तेथील स्थानिक असे मानतात की, महिलांचा साज पुरुषांनी केल्यास त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. यामुळेच पुरुष मंडळी साडी नेसण्यासह महिलांप्रमाणे साज-श्रृंगार करतात. गावातील नागरिकांचा असा विश्वास आहे की, जोवर पुरुष या परंपरा पार पाडणार नाही तोवर गावाच्या कल्याण्यासाठीच्या सामूहिक इच्छआ अपूर्ण राहतात.

आणखी वाचा : 

दिल्ली, मुंबई नव्हे जयपुर आहे राजस्थानमधील सुखी जिल्हा

इंटरमिटेंट फास्टिंग’ केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका? काय सांगतात तज्ज्ञ...

Health : रात्रीच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही खाऊ नका, या गोष्टीमुळे होऊ शकतो सांधेदुखीचा त्रास

Share this article