पराठ्यांसाठी पीठ मळताना टाका हा 1 चमचा मसाला, अपचनाची समस्या होईल दूर

Published : Dec 24, 2024, 08:25 AM ISTUpdated : Dec 24, 2024, 08:38 AM IST
Multigrain-paratha-for-sargi

सार

थंडीत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तयार केले जातात. पण पराठ्याचे सेवन केल्यानंतर काहींना गॅस, अपचन किंवा शौचास समस्या निर्माण होते. अशातच पराठ्यांसाठी पीठ मळताना एका खास मसाल्याचा वापर केल्यास या समस्या दूर होऊ शकतात.

Ajwain benefits : थंडीच्या दिवसात गरमागरम पराठ्यांचे सेवन केले जाते. बटाटा ते मटर पराठा आवर्जुन थंडीच्या दिवसात तयार केला जातो. यामुळे तोंडाची चव अधिक वाढलीही जाते. काहीजण एकाच वेळी 4-5 पराठ्यांचे सेवन करतात. पण असे केल्याने पोट फुगीची समस्या उद्भवू शकते किंवा लवकर पचन होत नाही. खरंतर, पराठ्यांचे सेवन केल्यानंतर काहींना गॅस, बद्धकोष्ठता, अपचन किंवा शौचास समस्या उद्भवली जाऊ शकते. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी पराठ्याचे पीठ मळताना एक खास मसाला वापरावा. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया...

पराठा तयार करताना वापरा ओवा

  • थंडीच्या दिवसात पराठ्यांचे आवडीने सेवन केले जाते. पण पोटासंबंधित समस्येपासून दूर राहण्यासाठी मैद्याचे पीठ पराठ्यांसाठी वापरणे टाळा. यासाठी गव्हाचे किंवा अन्य पीठाचा वापर पराठ्यांसाठी करावा.
  • पराठ्यांचे सेवन केल्यानंतर गॅस, अपचनसारख्या समस्या उद्भवू नये म्हणून पीठ मळताना त्यामध्ये एक चमचा ओवाही घाला. याशिवाय ओव्याची पानेही कापून पीठात घालू शकता.
  • पराठ्यांच्या पीठामध्ये कोबी, मुळा किंवा बटाटा घातला तरीही ओव्याचा वापर करा. यामुळे थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होईल. ओव्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
  • पराठ्यांच्या पीठामध्ये किंवा पोळीमध्ये ओवा मिक्स केल्यास पोटात गॅस होणे, अपचन किंवा आंबट ढेकर येण्याची समस्या दूर होईल. रात्रीच्या वेळेस पराठा तयार करतानाही त्याच्या पीठात ओवा मिक्स करा. असे केल्याने पराठ्याचे लवकर पचन होण्यासह बद्धकोष्ठता किंवा पोटासंबंधित अन्य समस्या दूर होऊ शकतात.

ओव्याचे आरोग्यदायी फायदे

ओव्याच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, फॉस्फोरस, कॅल्शियम, लोहसह काही अन्य पोषण तत्त्वे असतात. तुम्हाला पचनासंबंधित समस्या असल्यास ओव्याचे सेवन करू शकता. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठीही ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. ओव्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब, सूज येणे, पोटात गॅस होणे किंवा स्नायूंचे दुखणे दूर होण्यासह काही आजारही दूर राहतात.

आणखी वाचा : 

दररोज भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे माहितेयत? घ्या जाणून

पचनापासून हृदयापर्यंत, हिवाळ्यात मेथीचे लाडू खाण्याचे 5 फायदे

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!