सारा तेंडुलकरचे बीचवरील ग्लॅमरस फोटो व्हायरल

सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बीचवरचे तिचे हे फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत, तर काहींनी तिच्या ड्रेसवरून कमेंट करायला सुरुवात केली आहे.
 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Master Blaster Sachin Tendulkar) यांची कन्या सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. अतिशय सुंदर असलेल्या साराचे लाखो चाहते आहेत. सारा सोशल मीडियावर सक्रिय असते. वेळोवेळी ती तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना आनंद देत असते. आता साराचे काही फोटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सारा तेंडुलकरचे लेटेस्ट फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ग्लॅमरस लूकमध्ये (glamorous look) दिसणारी सारा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच ट्रोलर्सनाही ती चर्चेचा विषय ठरली आहे.

सारा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिने लिझर्ड आयलंड (Lizard Island) वर फोटो काढले आहेत. सारा तेंडुलकरने तिच्या इंस्टा अकाउंटवर काही फोटो पोस्ट करून 'लिझर्ड आयलंड' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये सारा तेंडुलकरने हिरव्या रंगाचा सिल्क ड्रेस घातला आहे. समुद्राच्या पाण्यात खेळणारी सारा, समुद्रकिनारी काही फोटो आणि पाणी, वाळूच्यामध्ये काही फोटोंसाठी पोज दिली आहे. टोन्ड लेग फोटोसोबत चेरी खाण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओही तिने पोस्ट केला आहे. साराचे हे फोटो काही चाहत्यांना आवडले असले तरी काहींनी तिला ट्रोल केले आहे. 

स्टनिंग, सुपर असे म्हणणाऱ्या चाहत्यांनी शुभमन गिल (Shubnam Gill) आणि साराचे लग्न पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे कमेंट केले आहेत. साराचा ड्रेस, लूक आवडल्याचे सांगणाऱ्या चाहत्यांनी लिझर्ड मिस झाली आहे असे म्हटले आहे. काहींना साराची पोज आवडलेली नाही. तेंडुलकरने या वेळी ब्रेक न घेता खेळून विक्रम केला असता, अशी एकाने कमेंट केली आहे. पण तेंडुलकरच्या चाहत्यांनी साराबद्दलच्या वाईट कमेंट्सचा निषेध केला आहे. तेंडुलकरची कन्या सारा आहे, कृपया तिला आदर द्या, असा प्रतिसाद दिला आहे.

सारा इंस्टाग्रामवर सक्रिय असून तिचे ६.६ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या सारा तेंडुलकरने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर साराने फॅशन क्षेत्र निवडले. ग्लॅमर जगतात पदार्पण केलेल्या सारा २६ व्या वर्षी कोट्यधीश आहे. पोषणतज्ञ आणि मॉडेल म्हणून ती पैसे कमवत आहे.  

माध्यम वृत्तानुसार, २०२३ मध्ये सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपये इतकी आहे. सारा स्वतःचा ऑनलाइन व्यवसाय चालवते. यावर्षी ती भारतात कोरियन ब्युटी ब्रँड लेनीजची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडली गेली आहे. सुरुवातीला सारा क्रिकेट निवडेल असे वाटत होते. पण साराने फॅशन क्षेत्र निवडले. तिच्या कामात तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचे पूर्ण समर्थन आहे. शुभमन गिलसोबत साराचे नाव जोडले गेले असून, वेळोवेळी कॅमेऱ्यात हे दोघेही एकत्र दिसून चर्चेत आले आहेत. 

Share this article