Reduce Belly Fat : पोटावरील चरबी कमी करतील ही 7 फळ, तंदुरुस्तही रहाल

Reduce Belly Fat : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणे महत्वाचे आहे. द्राक्षे, कलिंगड, किव्ही अशा फळांच्या सेवनाने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

Reduce Belly Fat : पोटावरील वाढलेल्या चरबीमुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे. वसा, कार्बोहाइड्रेट आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर रहावे असा सल्ला दिला जातो. डाएटमध्ये कमी कॅलरीज असणारे पदार्थांचा समावेश करावा. अशातच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणती फळं मदत करतात याबद्दल जाणून घेऊया.

बेरीज
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरीसारख्या बेरीजमध्ये कमी कॅलरीज आणि अँटीऑक्सिडेंट्स अत्याधिक असतात. याशिवाय फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्सचा बेरीज उत्तम स्रोत आहे. बेरीजच्या सेवनाने सूजेची समस्या कमी होण्यासह वजन कमी करण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा काही बेरीजच्या सेवनाने पोटावरील चरबीही कमी होते.

द्राक्षे
द्राक्षांमध्ये ब्रोमेलॅन असते. यामुळे पचन आणि पोट दुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय द्राक्षांमध्ये उच्च फायबर आणि पाणी वजन कम करण्यास मदत करतात.

कलिंगड
कलिंगडमध्ये कॅलरीज कमी असतात आणि पाणी अत्याधिक प्रमाणात असते. यामुळे पोटावरील चरबी ते वजन कमी होण्यास कलिंगडामुळे मदत होते.

एवोकाडो
एवोकाडोमध्ये हेल्दी वसा आणि फायबर असतात. यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

किवी
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. किवीच्या सेवनाने पचनास मदत होते, रक्त शर्करेचा स्तर नियंत्रित राहतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.

सफरचंद
सफरचंदामध्ये फायबर आणि पाणी पुरेशा प्रमाणात असते. सफरचंदाच्या सेवनाने शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.

आणखी वाचा : 

केसांच्या प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आवळा, वाचा फायदे

सतत जंक फूड खाण्याची आवड आहे? होईल हा गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

Share this article