Dussehra 2024 : दसऱ्या दिवशी या मंदिरात 300 वर्षांपासून केली जाते रावणाची पूजा

Dussehra 2024 : विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण महाराष्ट्रातील एका गावात रावणाची पूजा-आरती केली जाते.

Dussehra 2024 Ravan Pujan : प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाते. यंदा दसरा 12 ऑक्टोबरला साजरा केला जत आहे. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण महाराष्ट्रातील एका ठिकाणी रावणाची पूजा आणि महाआरती केली जाते. अकोल्यातील संगोला गावात रावणाची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्याची संगोला गावाची परंपरा आहे. खास गोष्टी अशी की, रावणाची एक प्राचीन प्रतिमा असून काळ्या पाषाणापासून तयार करण्यात आलेली आहे.

किती वर्षांपासून सुरुयं कमवायची परंपरा?
संगोला गावातील गावकरी सांगतात की, आमच्याकडे जवळजवळ 300 वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा-आरती केली जाते. ही परंपरा कोणी सुरू केली, का सुरू केली याबद्दल अधिक माहिती नाही. पण रावण ब्राम्हण परिवारातील होता आणि महाविद्वानही होता. यामुळेच आमच्या पुर्वजांनी दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्याची सुरुवात झाली होती. खास गोष्ट अशी की, येथे रावणासह भगवान श्री रामांचीही पूजा केली जाते.

रावणाची आरती

आरती कीजे दशानन जी की। लंकापति श्री रावण जी की।।

जाके बल से त्रिलोक डरता ।सुमिरो जो भूखा न मरता।।

कैकसी पुत्र महाबल दायी। बना दे जो पर्वत को रायी।।

संतो को सदा तुमने मारा। पृथ्वी का कुछ बोच उतारा।।

बहन की नाक का बदला लीन्हा। सीता को अगवा कर दीन्हा।।

राम ने धमकी कई भिजवाई। तुमने सबकी सब ठुकराई।।

सीता की खोज में वानर आया। पूत तुम्हारा पकड़ उसे लाया।।

तेल में उसकी पूछ जलाई। फिर पीछे से आग लगाई।।

वानर बोमा बचाए हलका। उछल कूद में जल गयी लंका।।

फिर भी तुम हिम्मत नही हारी। लंका इक दिन में बना दारी।।

बिचड़ा पुत प्राणों को देके। फिर भी न युद्ध में घुटने टेके।।

राम की सेना में आगे आयो। कितनो को तुम मार गिरायो।।

भ्राता ने जब गद्दारी दिखाई। वीरगति तब तुमने पाई।।

आणखी वाचा : 

Dasara वेळी शमीची पूजा आणि गुप्त दान का करतात? वाचा खास गोष्टी

दसऱ्यानिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा हे 5 स्वादिष्ट गोड पदार्थ

Read more Articles on
Share this article