केसांना कलर केलाय? रंग दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी खास 5 टिप्स

Published : May 13, 2024, 08:16 AM ISTUpdated : May 13, 2024, 08:19 AM IST
Hair Care Tips

सार

Hair Care : आजकाल हेअर कलर करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हेअर कलर दीर्घकाळ टिकवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. जाणून घेऊया केसांना केलेला हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नककी काय करावे.

Hair Care Tips : केसांना हेअर कलर करण्यासाठी बहुतांशजण पार्लरमध्ये जातात अथवा घरच्याघरीच हेअर कलरिंगचा वापर करुन केस रंगवतात. पण काही गोष्टींमुळे केसांना केलेला रंग कालांतराने फिकट होण्यास सुरुवात होते. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण काही सामान्य कारणे म्हणजे चुकीच्या पद्धतीने केस धुणे अथवा हेअर कलर केल्यानंतर केसांची व्यवस्थितीत काळजी न घेणे. अशातच हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नक्की काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

हेअर कलर केल्यानंतर शॅम्पूने केस धुवावेत का?
हेअर कलर केल्यानंतर रंग केसांवर सेट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. अशातच हेअर कलर केल्यानंतर  लगेच शॅम्पूने केस धुणे टाळले पाहिजे. यामुळे हेअर कलर फिका होऊ लागतो. खरंतर, हेअर कलर केल्याच्या तीन दिवसांपर्यंत शॅम्पू करणे टाळले पाहिजे. केसांना हेअर कलर केल्यानंतर स्वच्छ करावेसे वाटत असल्यास केवळ थंड पाण्याने केस धुवावेत.

कलर प्रोटेक्टेंट शॅम्पूचा वापर
हेअर कलर केल्यानंतर केस धुण्यासाठी योग्य शॅम्पूचा वापर करणे अत्यावश्यक असते. यासाठी कलर प्रोटेक्टेंट शॅम्पूची निवड करावी. शॅम्पू सल्फेट फ्री असावा. कलर प्रोटेक्टेंट शॅम्पूमध्ये असलेले सिलिकोन हेअर कलर दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतात. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी, स्लफाइट्सआय आणि अल्कोहोलयुक्त शॅम्पूच्या माध्यमातून केस धुणे टाळावे.

हेअर कंडीशनरचा वापर
हेअर करलरसाठी प्रोक्टेंट शॅम्पूसह कंडीशनरचाही वापर करावा. हेअर कलरिंगमुळे केसांची नैसर्गिक चमक कमी होण्यासह अधिक कोरडे होतात. अशातच कंडीशनरचा वापर केल्याने केसांमध्ये ओलावा आणि हेल्दी राहण्यास मदत करतात.

केस वारंवार धुणे टाळावे
हेअर कलर केल्यानंतर केस धुताना त्यामधून रंग निघतो आणि कालांतराने फिका होतो. अशातच केस वारंवार धुणे टाळले पाहिजे. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. अशातच केस कोरडे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

हिटींग टूल्सचा अत्याधिक वापर टाळावा
हेअर कलर केल्यानंतर केसांना स्टायलिश लुक देण्यासाठी बहुतांशजण हिटींग टुल्सचा वापर करतात येतो. पण सातत्याने हिटींग टूल्सचा केसांसाठी वापर केल्याने केसांची नैसर्गिक चमक दूर होते.

आणखी वाचा : 

केस मूळापासून होतील मजबूत, घरच्या घरी असे तयार करा कांद्याचे तेल

हेल्दी आहार म्हणजे काय ? हेल्दी राहण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!