उपाशी पोटी खा काळ्या मनुका, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह होतील हे 5 फायदे

Health Care : मनुक्यांचा वापर आपण काही पदार्थांमध्ये करतो. याशिवाय आई किंवा आजी मनुके रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खाण्याचा सल्ला देतात. खरंतर, उपाशी पोटी काळ्या मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

Benefits of eating soaked Black Raisins : सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण कोणते पदार्थ खातो याचा आपल्या आरोग्यासह शरिरातील उर्जा, ब्लड ग्लुकोजवर प्रभाव पडतो. काळ्या मनुका अथवा ड्राय फ्रुट्समध्ये पोषक तत्त्वे आणि फायबरचे प्रमाण अत्याधिक असते. याच कारणास्तव सकाळच्या नाश्तायमध्ये ड्राय फ्रुट्सचा समावेश करावा असा सल्ला दिला जातो. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले देखील राहतो. अशातच सकाळी उपाशी पोटी काळ्या रंगातील मनुके खाल्ल्यास याचा आरोग्याला वेगवेगळ्या रुपात फायदा होतो. याबद्दल जाणून घेऊया...

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
काळ्या मनुकांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होतो. याशिवाय वजन कमी करण्यासाठी डाएटमध्येही काळ्या मनुकांचा वापर करू शकता. यामध्ये असलेले अन्य व्हिटॅमिन आणि खनिजे असल्याने काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

पचनासाठी उत्तम
काळ्या मनुकांमुळे पचनक्रिया सुधारली जाते. यामध्ये असलेले उच्च फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करतात. काळ्या मनुकांमुळे गोड खाण्याची इच्छाही कमी होते.

अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात
काळ्या मनुका अँटीऑक्सिडेंट्सचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरिर डिटॉक्स करण्यास मदत होते. सकाळी उपाशी पोटी मनुका खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

शरिराला उर्जा मिळते
शरिरातील उर्जेचा स्तर वाढवण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. अशातच शरिरात हिमग्लोबीनची कमरता असल्यास काळ्या मनुक्यांचे सेवन करू शतताय. याशिवाय अ‍ॅनिमियाची समस्या असल्यास काळ्या मनुकांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हाडांच्या आरोग्यासाठी काळ्या मनुक्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. महिलांनी काळ्या मनुक्यांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण वयानुसार ढिसूळ होणाऱ्या हाडांच्या मजबूतीसाठी काळ्या मनुका अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

आणखी वाचा : 

केस मूळापासून होतील मजबूत, घरच्या घरी असे तयार करा कांद्याचे तेल

हेल्दी आहार म्हणजे काय ? हेल्दी राहण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

Share this article