कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण तुम्ही केसगळतीच्या समस्येचा सामना करताय? नक्कीच कांद्याचे तेल केसांसाठी उपयुक्त ठरू शकते.
कांद्याचे तेल तयार करण्यासाठी दोन कांद्यांचा रस, चार मोठे चमचे नारळाचे तेल घ्यावे लागेल.
सर्वप्रथम एका भांड्यात तेल आणि कांद्याचा रस व्यवस्थितीत मिक्स करा.
गॅसवर मंद आचेवर कढई ठेवून त्यामध्ये कांद्याचा रस आणि तेल मिक्स केलेले मिश्रण टाका. यानंतर 5-10 मिनिटे तेल गरम करा.
तेल गरम झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर सुती कापडामधून गाळून घ्या. अशाप्रकारे तयार होईल घरच्या घरी कांद्याचे तेल.
कांद्याच्या तेलाने केसांच्या मूळांना मसाज केल्यास मजबूत होण्यासह केसगळतीची समस्या कमी होईल.
कांद्याच्या तेलामुळे केस मूळापासून मजबूत होण्यास मदत होऊ शकते. यामुळे केस वाढही होईल.
सडपातळ आणि उंच तरुणींसाठी शनायासारखे 7 हटके लुक, पार्टनर होईल लट्टू
कोण आहे मोना पटेल ? जिच्या मेट गालामध्ये टिकल्या सगळ्यांचा नजरा
अक्षय्य तृतीयेला भाग्य उजळण्यासाठी करा या 5 वस्तूंचे दान
Akshay Tritiya 2024 : या 8 डिझायनर पिवळ्या साडीत दिसाल लक्ष्मीचे रूप