ओव्हरइटिंग पासून दूर राहण्यासाठी 5 खास टिप्स, अपचनाची समस्याही होणार नाही

सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या समस्येमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. काहीजण रात्रीच्या वेळ अत्याधिक प्रमाणात खातात. यामुळे आरोग्य बिघडले जाते. ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.

Chanda Mandavkar | Published : Aug 12, 2024 8:40 AM
16
ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी टिप्स

ओव्हरइटिंग अशी स्थिती आहे ज्यावेळी दिवसभर उपाशी राहिल्यानंतर एकाच वेळी भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. अथवा आवडीचा एखादा पदार्थ समोर आल्यानंतर ओव्हरइटिंग केले जाते. काहीवेळेस तणावामुळेही ओव्हरइटिंग होते. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे अपचन, पोटदुखी, सुस्ती येणे अशा समस्या उद्भवल्या जातात. यापासून दूर राहण्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत.

26
संतुलित आणि नियमित भोजन करा

ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी संतुलित आणि नियमित वेळेनुसार भोजन करावे. यासाठी लहान-लहान भागात हेल्दी अन्नपदार्थांचे सेवन करु शकता. जेणेकरुन भूकेवर नियंत्रण ठेवता येईल. याशिवाय ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर रहाल.

36
अन्नपदार्थ व्यवस्थितीत चावून खा

बहुतांश आरोग्य तज्ज्ञ असा सल्ला देतात की, अन्नपदार्थ हळूहळू आणि व्यवस्थितीत चावून खाल्ले पाहिजेत. जेणेकरुन ते शरिरात पचले देखील जातात. जेवताना टीव्ही अथवा मोबाईल पाहू नये. यामुळे ओव्हरइटिंग होऊ शकते. अशातच वजन वाढण्यासह अन्य काही आजार मागे लागू शकतात.

46
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या

जेवणापूर्वी अर्धा तास आधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोट भरले जाते आणि अन्नपदार्थांचेही मर्यादित प्रमाणात सेवन केले दाते. ओव्हरइटिंगसच्या समस्येपासून दूर रहायचे असल्यास जेवणाआधी एक ग्लास पाणी प्या. याशिवाय दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन शरिर हाइड्रेट राहण्यासह भूकेवर नियंत्रण राहिल.

56
प्रोटीनचा डाएटमध्ये समावेश करा

डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. डाळी, नट्स, अंडी यांचे सेवन करु शकता. यामुळे वारंवार भूक लागणार नाही. याशिवाय शरिराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळाल्याने शरिराचे स्नायू बळकट होण्यासही मदत होईल.

66
पोषण तत्वांनी समृद्ध आहार घ्या

ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामध्ये फळ, भाज्या अथवा मोड आलेली कडधान्ये याचे सेवन करु शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासह अपचनासारख्या समस्यांपासून दूर राहता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

उपाशीपोटी खा लसणाच्या 2 पाकळ्या, रहाल आजारांपासून दूर

वेगाने वजन कमी करण्याचा विचार करताय? वाचा काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ

Share this Photo Gallery
Recommended Photos