लसूणमध्ये व्हिटॅमिन बी1, बी2, फोलेट, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, लोह आणि पोटॅशिअमसह अनेक गुणधर्म असतात. दररोज उपाशी पोटी लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊया.
दररोज उपाशी पोटी लसणाचे सेवन केल्याने शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. याशिवाय काही आजारांपासून तुम्ही दूर राहता.
लसणाच्या सेवनाने शरिरातील ग्लूटाथियोनचा स्तर वाढण्यास मदत होते. हे अँटीऑक्सिडेंट तणावाच्या विरोधात काम करते.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठी कच्च्या लसणाच्या पाकळ्यांचे सेवन करावे. यामुळे दीर्घकाळ राहण्यासही मदत होते.
लसणाच्या सेवनाने ब्लड प्रेशर कमी करण्यासह शरिरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. एवढेच नव्हे हृदायाचे आरोग्य सुधारले जाते.
कच्च्या लसणामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि सल्फर युक्त गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय काही आजारांपासून दूर राहता.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.