भाजीमधून किडे काढण्यासाठी वापरा या 5 ट्रिक, मिनिटांत होईल स्वच्छ

कोबी, पालक सारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे असतात. यासाठी मीठ, व्हिनेगर, बेकिंग सोडा अशा वस्तूंचा वापर केला जातो. जेणेकरुन भाजीमधील किडे निघून जात स्वच्छ होईल.

Leafy Vegetables Cleaning Tricks : भाजी मार्केटमधून आपण कधीकधी आठवड्याभराच्या भाज्या एकत्रित आणतो. यापैकी काही भाज्यांमध्ये अचानक किडे निघतात. खासकरुन कोबी, फ्लॉवर किंवा एखाद्या पालेभाजीमध्ये किडे असतात. या किड्यांमुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते. अशातच या भाज्या शिजवण्यापूर्वी स्वच्छ धुणे महत्वाचे असते. भाज्या धुण्यासाठी पाणी नव्हे तर अन्य दुसऱ्या वस्तूंचा देखील वापर करावा. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

कोमट पाणी आणि मीठ

एका मोठ्या भांड्यामध्ये कोमट पाणी घ्या. यामध्ये 2-3 चमचे मीठ घातल्यानंतर भाजी यामध्ये बुडवून ठेवा. 10-15 मिनिटानंतर भाजी मीठाच्या पाण्यातून काढून पुन्ह स्वच्छ पाण्यात धुवा. पालक, मेथी अशा भाज्या मीठाच्या पाण्यात धुवाव्यात.

व्हिनेगर आणि पाणी

एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 2-3 चमचे व्हाइट व्हिनेगर घातल्यानंतर 10 मिनिटे भाजी बुडवून ठेवा. जेणेकरुन भाजीमधील किडे निघून जाण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा आणि पाणी

एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. भाजीच्या या पाण्यामध्ये 5-10 मिनिटे बुडवून ठेवा. बेकिंग सोड्यामुळे भाजीमधील किडे निघून जाण्यास मदत होईल.

हळदीचे पाणी

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे भाजीमधील बारीक किडे निघून जाण्यास मदत होईल. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा हळद घाला. या हळदीच्या पाण्यामध्ये भाजी 10 मिनटे बुडवून पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि पाणी

एका भांड्यात पाणी आणि दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करा. यामध्ये भाजी 10-15 मिनिटे बुडवून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा.

या गोष्टींची घ्या काळजी

भाजी पाण्याने देखील 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. याशिवाय पालेभाज्या नेहमीच बारीक चिरुन धुवाव्यात. वरील काही ट्रिक्सने नक्कीच भाजीमधील घाण आणि किडे दूर होण्यास मदत होईल. 

आणखी वाचा :

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे घ्या जाणून! मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त

कांदा खाणे शरीराला का गरजेचं आहे, फायदे जाणून घ्या

Share this article