तोंडाला सुटेल पाणी, वाचा Creamy Macaroni Pasta रेसिपी स्टेप बाय स्टेप

Published : Jan 16, 2025, 04:00 PM IST
Creamy Pasta Recipe

सार

Creamy Macaroni Pasta Recipe : मॅकरोनी पास्ताचे सेवन करणे बहुतांशजणांना आवडते. खासकरुन मुलांना पास्ता फार आवडतो. अशातच क्रिमी मॅकरोनी पास्ताची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी स्टेप बाय स्टेप पाहूया.

Creamy Macaroni Pasta Recipe in Marathi : पास्ता लहान मुलांना खूप आवडतो. पण हेल्दी आणि पौष्टिक पास्ता तयार करण्यासाठी ऑर्गेनिक पास्ताही सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशातच संध्याकाळच्या स्नॅक टाइमवेळी क्रिमी असा मॅकरोनी पास्ता कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूया स्टेप बाय स्टेप...

सामग्री

  • 2 कप मॅकरोनी
  • 2 मोठे कांदे बारीक चिरलेले
  • 3 टोमॅटो बारीक चिरलेले
  • 2 हिरव्या मिरची
  • 2 टिस्पून लसूण
  • 1 कप शिमला मिरची बारीक चिरलेली
  • 1/2 कप गाजर बारीक चिरलेला
  • 1 टिस्पून काळीमिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  • 2 टिस्पून ऑरिगॅनो
  • 2 टिस्पून तेल
  • 2 टिस्पून मलाई
  • 1/2 केचअप
  • चीज

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करुन त्यामध्ये मॅकरोनी टाका. यानंतर थोडे तेल आणि मीठही घाला. जेणेकरुन मॅकरोनी एकमेकांना चिकटले जाणार नाही.
  • कढईमध्ये तेल गरम करुन लसूण भाजून घ्या.
  • तेलात कांदा आणि अन्य भाज्याही परतून घेऊन भाजून घ्या.
  • भाज्यांमध्ये टोमॅटो घालून शिजवून घ्या.
  • कढईमधील मिश्रणात केचअप आणि मलई, काळीमिरी पावडर घालून घ्या. सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
  • मिश्रणामध्ये उकडलेली मॅकरोनी मिक्स करा. आता पुन्हा सर्व सामग्री एकत्रित मिक्स करुन 10 मिनिटांसाठी शिजवा. यामध्ये चीज देखील घालू शकता. जेणेकरुन पास्ता अधिक क्रिमी होण्यास मदत होईल.
  • पास्ता शिजल्यानंतर कढईतून एका प्लेटमध्ये काढा. यावरुन ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि काळीमिरी पावडर स्प्रे करा.

आणखी वाचा : 

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना देण्यासाठी 8 पौष्टिक नाश्ता रेसिपी

रेस्टॉरंटसारखे तयार करा Crispy Manchurian Balls, वाचा सोपी रेसिपी

PREV

Recommended Stories

थंडीत हि ज्वेलरी घालून लग्नात करा हवा, स्वेटर-शॉलवर घाला फॅन्सी डिझाइन
पत्नीला भेट द्या 5gm चे सुंदर सुई धागा कानातले, खुप सुंदर दिसतील!