तुमचे पोट बिघडल्यास प्या हे 5 हेल्दी ड्रिंक, मिळेल लगेच आराम, वाचा रेसिपी

Published : Apr 18, 2025, 01:20 PM ISTUpdated : Apr 19, 2025, 12:52 PM IST

Drinks For Upset Stomach : पोट बिघडल्यानंतर भूक लागली तरीही काहीही खावेसे वाटत नाही. अशातच पोट बिघडल्यास कोणता घरगुती उपाय करू शकता हे जाणून घेऊया. 

PREV
16
पोट बिघडण्याची समस्या

पोट बिघडणे ही एक सामान्य समस्या आहे. पोटात गॅस होणे, अपचन किंवा मळमळ अशा समस्येवेळी काही नॅच्युरल आणि हेल्दी ड्रिंक पिऊ शकता. जेणेकरुन पचनक्रिया सुधारण्यासह आराम मिळेल. अशातच पोट बिघडल्यास कोणते हेल्दी ड्रिंक प्यावे हे जाणून घेऊया.

26
आल्याची चहा

आल्याची चहा अनेक वर्षांपासून पोटाच्या समस्येवर उपाय म्हणून प्यायली जाते. यामध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेंटरी गुण असल्याने पोटात दुखणे, ढवळणे अशा समस्या दूर होऊ शकतात. आल्याची चहा तयार करण्यासाठी आल्याचे तुकडे पाण्यामध्ये उकळून घ्या. यानंतर पाणी गाळून प्या. आल्याची चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारली जाते.

36
बडीशेपचे पाणी

बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि डाइजेस्टिव्ह गुण असल्याने पोटात सूद येणे, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळतो. याची चव हलकी गोडसर असल्याने पोटाला थंडावा मिळतो.

46
पुदीन्याची चहा

पुदीना पोटाला थंडावा देतो. यामुळे स्नायूंना आरामही मिळतो. पोटात दुखणे, गॅसची समस्या पुदीन्याच्या चहापासून दूर होण्यास मदत होईल. पुदीन्याची चहा तयार करण्यासाठी पुदीन्याची पाणी गरम पाण्यात उकळून त्याचे पाणी गाळून प्या.

56
नारळाचे पाणी

पोट बिघडल्यास शरीतात डिहाइड्रेशनची समस्या उद्भवली जाते. यावेळी नारळाचे पाणी पिऊ शकता. यामध्ये इलोक्टोलाइट्स असतात जे शरीराला हाइट्रेड ठेवण्यास मदत करतात.

66
ताक

ताक एक नॅच्युरल प्रोबायोटिक असून जे पोटातील गुड बॅक्टेरियाला वाढवण्यास मदत करतात. यामध्ये काळं मीठ आणि भाजलेले जीरे मिक्स केल्यास पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय अपचनाच्या समस्येपासून दूर राहता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Recommended Stories