सकाळी उठल्या उठल्या आपण नकळतपणे अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. या चुका टाळल्यास नाश्त्यापूर्वीच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येईल.
सकाळी रिकाम्या पोटी साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. ही सवय दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या शुगर लेव्हलवर परिणाम करते.
25
सकाळी उठल्यावर बेडवर बसून राहणे
झोपेतून उठल्यावर व्यायाम न करता बेडवर किंवा सोफ्यावर बसून राहणं योग्य नाही. सकाळी शरीरात कॉर्टिसोल हार्मोनची पातळी जास्त असते, ज्यामुळे नैसर्गिकरित्या शुगर वाढते. त्यामुळे हलका व्यायाम करणं गरजेचं आहे.
35
उपाशी किंवा मैद्याचे पदार्थ
रात्रभर उपाशी राहिल्यानंतर मैद्याचे किंवा गोड पदार्थ खाल्ल्यास शुगर अचानक वाढू शकते. आहारात प्रोटीन आणि फायबर नसल्यास रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने कमीही होते.
सकाळी उठल्याबरोबर फोन तपासणं किंवा ऑफिसच्या कामाची चिंता केल्याने शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. दिवसाच्या सुरुवातीची ही सवय शुगर लेव्हल वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे.
55
रात्री व्यवस्थितीत झोप न लागणे
रात्री नीट झोप झाली नाही, तर इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते. चांगली झोप झाल्यावर जो पदार्थ खाल्ल्याने शुगर वाढत नाही, तोच पदार्थ अपुऱ्या झोपेनंतर खाल्ल्यास ब्लड शुगर मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.