चेहऱ्यावरील वाढत्या पिग्मेंटेशनच्या समस्येवर 5 घरगुती उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

Published : Apr 19, 2025, 05:40 PM IST

कडक उन्हामध्ये अत्याधिक वेळ घालवल्याने आणि शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलावामुळे पिग्मेंटेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे त्वचेचा रंगात बदल झालेला दिसण्यासह चेहऱ्यावर काळे डाग येतात. अशातच पिग्मेंटेशनच्या समस्येवरील घरगुती उपाय जाणून घेऊया.

PREV
16
चेहऱ्यावरील वाढती पिग्मेंटेशनची समस्या

चेहऱ्यावरील वाढत्या पिग्मेंटेशनच्या समस्येमागे काही कारणे असू शकतात. पण दीर्घकाळ कडक उन्हामध्ये राहिल्याने मेलेनिनचा प्रभाव वाढू लागतो. अशातच पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते. या समस्येवेळी कपाळावर, गळ्यावर आणि नाकावर काळे डाग येऊ लागतात.

26
एलोवेरा जेलचा वापर

एलोवेरा जेलमध्ये एलोसीन कंम्पाउंड्स असतात. यामुळे मेलेनिनचा स्तर नियंत्रित केला जाऊ शकतो. शुद्ध एलोवेरा जेलचा दररोज वापर केल्याने त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासह त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत होते.

36
बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये कॅटेकोलेज नावाचे तत्व असते. यामुळे त्वचेचा रंग हलका करणारे एंग्जाइम असतात. यामुळे त्वचेवर वाढणारी पिग्मेंटेशनची समस्या कमी होऊ शकते. यासाठी कच्च्या दूधामध्ये बटाट्याचा एक तुकडा कापून चेहऱ्याला लावा किंवा बटाट्याचा रस त्वचेला लावा.

46
लिंबाचा रस आणि मध

व्हिटॅमिन सी युक्त लिंबामुळे त्वचेला ग्लो येतो, याशिवाय त्वचा मऊसर होण्यासही मदत होते. चेहऱ्यावर लिंबाच्या रसासोबत मध समप्रमाणात मिक्स केल्यास पिग्मेंटेशनची समस्या कमी होऊ शकते.

56
हळद आणि दूध

अँटी-इंफ्लेमेंटरी गुणांनी समृद्ध असणाऱ्या हळदीचा त्वचेला फायदा होतो. दूधासोबत हळद मिक्स करुन त्वचेला लावल्याने त्वचा हळूहळी एक्सफोलिएट आणि चमकदार होण्यास मदत होते. हळदीच्या पावडरला दूधासोबत मिक्स करुन पेस्ट तयार करुन चेहऱ्याला लावा.

66
दही आणि ओटमील मास्क

दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर होते. ओटमील त्वचेला मऊसर बनवते. दह्यामध्ये बारीक वाटलेले ओटमील मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर धुवा. यामुळे स्किनच्या टेक्सचरमध्ये बदल झालेला दिसेल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories