आरोग्यासाठी फायदेशीर 5 ज्यूस, डाएटमध्ये करा समावेश

Published : Apr 12, 2025, 04:38 PM IST

5 Healthy Juice for Health : आरोग्य हेल्दी रहावे यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. अशातच आरोग्यासाठी कोणते हेल्दी ज्यूस आहेत ज्याचे दररोज सेवन करू शकता याबद्दल जाणून घेऊया. 

PREV
15
गाजराचा ज्यूस

गाजराचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखले जाते. याशिवाय वजन कमी करणे, त्वचा आणि पचनक्रिया सुधारली जाते.अशातच डाएटमध्ये गाजराचा ज्यूस पिऊ शकता. 

25
उसाचा रस

उसाच्या रसामध्ये फायबर, व्हिटॅमिन, पोटॅशियम, सोडियम आणि लोह अशी पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने शरीराला आतमधून थंडावा मिळते, थकवा कमी होतो आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता.

35
मोसंबीचा ज्यूस

संत्र्याचा ज्यूस प्यालल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. याशिवाय त्वचा, पचनक्रिया आणि हृदयाचे आरोग्य राखले जाते.

45
डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असते. यामुळे आरोग्याला फायदा होतो. डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारणे, पनचक्रिया सुधारणे, वजन कमी होणे आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

55
सफरचंदाचा ज्यूस

सफरचंदाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, मॅग्नेशियम अशी पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने पॅक्टिन बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

Recommended Stories