Swollen Feet : पायांवरची सूज ते टाचांना भेगा; शरीरातील मोठ्या आजारांचे 5 संकेत

Published : Aug 26, 2026, 02:16 PM IST

पायांच्या समस्या अनेकदा सामान्य वाटतात, पण पायांमधील काही बदल गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. पायांवर सूज येण्यापासून ते टाचांना भेगा पडण्यापर्यंत, ही लक्षणं तुमच्या महत्त्वाच्या अवयवांमधील बिघाडाकडे कसं लक्ष वेधतात, हे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

PREV
16
पायांना होणाऱ्या वेदना
पायांमध्ये दिसणारा प्रत्येक बदल सामान्य नसतो. डॉ. शालिनी सिंग साळुंखे यांच्या मते, पाय आणि टाचांमधील काही लक्षणं शरीरात लपलेल्या गंभीर आरोग्य समस्यांचे संकेत देऊ शकतात.
26
सूज येणे
तुमच्या पायांवर सतत सूज येत असेल, तर हे लिव्हर, किडनी किंवा हृदयाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. शरीरातील पाणी आणि विषारी घटक योग्यप्रकारे बाहेर न टाकल्यामुळे असं होतं.
36
पाय थंड राहत असल्यास
जर तुमचे तळपाय नेहमी खूप थंड राहत असतील, तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा किंवा रक्ताभिसरण नीट होत नसल्याचं हे लक्षण आहे. रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि पाय थंड पडतात.
46
नसा फुगल्या असल्यास
जर तुमच्या पायांमधील नसा फुगलेल्या किंवा बाहेर आलेल्या दिसत असतील, तर तुम्हाला 'व्हेरिकोज व्हेन्स'चा (Varicose Veins) त्रास असू शकतो. हृदयाकडे जाणारं रक्त नसांमध्येच साचून राहतं, तेव्हा ही समस्या उद्भवते.
56
पायांना पडलेल्या भेगा
टाचांना पडलेल्या भेगांकडे केवळ त्वचेची समस्या म्हणून दुर्लक्ष करू नका. हे फॅटी लिव्हर, थायरॉईड किंवा अगदी मधुमेहासारख्या आजारांचंही लक्षण असू शकतं.
66
तज्ज्ञांची घ्या मदत
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दीर्घकाळ दिसत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना भेटायला हवं. वेळीच निदान झाल्यास भविष्यातील गंभीर आरोग्य धोके टाळता येतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories