आतड्यांचं आरोग्य जपण्यासाठी रोज सकाळी काही खास पेयं पिणं फायदेशीर ठरतं. जाणून घ्या या हेल्दी पेयांबद्दल.
दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केल्यास डिहायड्रेशन टाळता येतं. यामुळे आतड्यांच्या कार्यालाही चांगली मदत मिळते.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. रोज लिंबू पाणी प्यायल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोट फुगण्याची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी मेथीचं पाणी पिणं चांगलं असतं. यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
चिया सीड्समध्ये फायबर भरपूर असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांच्या आरोग्याला चालना मिळते.
आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. रोज आल्याचं पाणी प्यायल्याने आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
गॅस आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी आणि आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी दररोज पुदिन्याचा चहा पिणं फायदेशीर आहे.
रोज ताक प्यायल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस मदत होते. यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
ऑफिसवेअरसाठी 500 रुपयांत खरेदी करा हे ट्रेन्डी Cotton Suits
तुमचा पार्टनर तुमच्या प्रेमात वेडा आहे? 'या' 8 संकेतांवरुन लगेच ओळखा
रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट द्या या डिझाइन्सची अंगठी, होईल खूश
डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स आठवड्यात होतील गायब, करा हे घरगुती उपाय