महिलांना नखं वाढवण्याची खास आवड असतेय. पण काही महिलांची नखं वाढतात पण तुटलीही जातात. नैसर्गिक पद्धतीने आठवड्याभरात लांब नखांसाठी कोणत्या फूड्सचे सेवन करावे याबद्दल जाणून घेऊया.
सुंदर आणि मजबूत नखांसाठी भरपूर प्रमाणात हेल्दी डाएटचे सेवन करावे. नखांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए आणि सी महत्वाचे आहे. आठवड्याभरात नखं वाढवण्यासाठी भाज्या, आंबट फळांचे सेवन करावे.
नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अंड अत्यंत फायदेशीर मानले जाते. अंड्यामधील पांढऱ्या हिस्स्यात पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळते. नखांच्या आरोग्यासाठी प्रोटीन महत्वाचे असते.
दह्याचे सेवन दररोज केल्याने आरोग्याला काहीप्रकारे फायदे होतात. यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. दररोज दह्याचे सेवन केल्याने नखांना चमक येते.
गाजरमध्ये व्हिटॅमिन A,K,C, पोटॅशियम, फायबर, कॅल्शिअम आणि लोहसारखे महत्वाचे व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात. दररोज गाजराचे सेवन केल्याने नखं हेल्दी आणि लांब होतात.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. याचे दररोज सेवन केल्याने नखांचे सौंदर्य वाढण्यासह मजबूत होतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. यामुळे नखांचे आरोग्य राखण्यासह त्यांना चमक आणण्यास मदत करते. भोपळ्याच्या बियांचा डाएटमध्ये समावेश करू शकता.