थंडीच्या दिवास केसांची खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थंडीत केस कोरडी होण्यासह कोंड्याची समस्या उद्भवली जाते. यावरील काही घरगुती उपाय जाणून घेऊया…
थंडीत कोंड्याच्या समस्येमुळे केस गळण्यास सुरुवात होते. अशातच कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस केसांना कोमट तेलाने मसाज करा.
थंडीत केसांची वाढ होते. कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी थंडीत केस ट्रिम करू शकता.
थंडीच्या दिवसात दररोज केस धुण्यापासून दूर राहा. यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल सुकले जाते. यामुळे केस कोरडे होण्याची समस्या उद्भवली जाते.
कोंड्याच्या समस्येवर लिंबाचा रस रामबाण उपाय आहे. लिंबूमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे केसांमधील कोंडा आणि खाजेची समस्या दूर होण्यास मदत होते.
कोरफडचा वापर करून कोंड्याच्या समस्येपासून दूर राहू शकता. यासाठी शॅम्पूमध्ये कोरफडचा गर मिक्स करुन केस धुवा.
दह्यामध्ये प्रोटीन असल्याने केसांमध्ये होणारा कोंडा कमी होतो. केसांच्या मूळांना दह्याने मसाज करुन अर्ध्या तासांनी पाण्याने केस धुवा.