वयाच्या 60 वर्षानंतर रहाल हेल्दी आणि फिट, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल

Published : Nov 23, 2024, 11:12 AM IST
health care

सार

वयाच्या 60 व्या वर्षी स्वत:ला हेल्दी ठेवणे बहुतांशजणांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. अशातच आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. शारिरीक आणि मानसिक रुपात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Health care tips after 60 years : प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. वाढत्या वयासह काही आजार मागे लागण्यासह शरिरातील हाडं ठिसूळ होऊ लागतात. अशातच वयाच्या 60 व्या वर्षी हेल्दी आणि फिट राहणे फार आव्हानात्मक असते. यामुळे वयाच्या 60 व्या वर्षात तंदुरुस्त राहण्यासाठी दररोजलच्या लाइफस्टाइलमध्ये कोणते बदल करावेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

तणावापासून दूर राहा
वाढत्या वयासह सर्वप्रथम स्वत:ला मानसिक रुपात हेल्दी न राहिल्यास शारिरीक आरोग्य बिघडले जाते. यामुळे तणावापासून दूर राहणे फार महत्वाचे आहे. यासाठी दररोज वॉक, योगाभ्यास किंवा मेडिटेशन करावे. याशिवाय आवडता एखादा छंद जोपासावा.

शारिरीक हालचाल महत्वाची
वाढत्या वयासह स्नायू कमकुवत होऊ लागतात. यामुळे दुखापत होण्याची शक्यता वाढली जाते. यापासून दूर राहण्यासाठी नियमित रुपात स्विमिंग, सायकलिंग अशा शारिरीक हालचाली करू शकता. याशिवाय शरिराला तोल सावरता यावा यासाठी एका पायावर उभे राहण्याचा थोडावेळ सराव करू शकता.

डाएटकडे लक्ष द्या
वयाच्या 60 व्या वर्षानंतर हेल्दी राहण्यासाठी डाएटकडेही लक्ष देणे फार महत्वाचे आहे. यासाठी अन्नपदार्थात साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करावे. याशिवाय मोसमी फळ, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. डाएटमध्ये प्रोटीन,फायबर, कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश असावा. हाइड्रेट राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी देखील प्यावे.

नियमित हेल्थ चेकअप करा
वयाच्या 60 व्या वर्षी आरोग्यासंबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक सहा महिन्यांनी फुल बॉडी चेकअप करावे. याशिवाय कोणत्याही प्रकारची असामान्य लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

तोंड येण्याची समस्या 3 दिवसात होईल कमी, करा या 2 गोष्टींचे सेवन

थंडीच्या दिवसात खा या 3 प्रकारचे मुरांबे, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

PREV

Recommended Stories

Google Photos च्या माध्यमातून करता येणार आता प्रोफेशनल Reels, फॉलो करा या स्टेप्स
Saphala Ekadashi 2025 : यंदा सफला एकादशी कधी? जाणून घ्या योग्य तारखेसह शुभ मुहूर्त