तोंडातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य बाब आहे. यामागे काही कारणे असू शकतात. पण तोंडाच्या दुर्गंधीमुळे चारचौघात बोलणेही अवघड होऊन जाते. अशातच तोंडाच्या दुर्गंधीला दूर करण्यासाठी कोणत्या हर्ब्सचा डाएटमध्ये समावेश करू शकता याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
Herbs for Bad Breath : तोंडातून दुर्गंधी येण्याच्या समस्येचा प्रत्येकाने कधी ना कधी सामना केला असेल. काही पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. याशिवाय तोंडाच्या दुर्गंधीमागे काही कारणे असू शकतात. पण तोंडाच्या दुर्गंधीमुळे एखाद्या व्यक्तीशी बोलतानाही लाज वाटते. अशातच तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी सर्वप्रथम तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. दरम्यान, तोंडाच्या दुर्गंधीवर कोणत्या हर्ब्सचा वापर करू शकता याबद्दल जाणून घेऊया...
पुदीना
तोंडाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी पुदीन्याचा वापर करू शकता. पुदीन्यामधील मॅन्थॉल असते ज्यामुळे थंडावा मिळतो. याशिवाय पुदीन्यात अरोमॅटिक गुणधर्म असल्याने तोंडाच्या दुर्गंधीला दूर करण्यास मदत करतात. एवढेच नव्हे पुदीन्याचा डाएटमध्ये समावेश केल्यास तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात.
पुदीन्याचा असा करा वापर
पार्सले
ज्या व्यक्ती तोंडाच्या दुर्गंधीचा सामना करतात त्यांनी पार्सलेचे सेवन करावे. पार्सलेमध्ये क्लोरोफिल असते जे जीवाणुविरोधी गुणधर्मासाठी ओखळले जाते. याशिवाय पार्लसेचा डाएटमध्ये समावेश केल्यास तोंडातील बॅक्टेरिया कमी करण्यासह तोंडाची दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
असा करा वापर
बडीशेप
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बेस्ट पर्याय बडीशेप आहे. बहुतांशजण जेवणानंतर बडीशेप खडीसाखरेसोबत खातात. बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडातील बॅक्टेरिया कमी करू शकतात.
असा करा वापर
थाइम
थाइमचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. थाइममध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील बॅक्टेरिया दूर करण्याचे काम करते. यामुळे तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. थाइमचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.
असा करा वापर
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
लसणाचे 12 आरोग्यदायी फायदे, अपचनाची समस्याही होईल दूर
मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होऊ शकतो धोकादायक आजार, जाणून घ्या