शनीची साडेसाती म्हणजे काय?, जाणून घ्या तुमच्या जीवनावरील प्रभाव आणि उपाय!

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची साडेसाती हा एक विशेष कालावधी आहे जो प्रत्येक राशीवर ७.५ वर्षांचा प्रभाव टाकतो. हा काळ व्यक्तीच्या जीवनात आव्हाने आणि संधी दोन्ही घेऊन येतो.

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची साडेसाती हे नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. ही भीती नेमकी का निर्माण होते ते या शनीसंदर्भात आपल्याला जास्त माहिती नसते. चला तर मग या लेखातून जाणून घेऊयात शनीविषयी संपूर्ण माहिती.

शनीची साडेसाती म्हणजे काय?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देवाचे साडेसाती एक विशेष कालावधी आहे, जो प्रत्येक राशीवर 2737 दिवसांचा (सुमारे 7.5 वर्षांचा) प्रभाव टाकतो. या कालावधीत व्यक्तीच्या जीवनावर शनीचा प्रभाव थेट असतो, आणि याचे परिणाम व्यक्तीच्या जीवनात विविध स्वरूपात प्रकट होतात.

सध्या शनीची साडेसाती कोणावर आहे?

सध्या शनी कुंभ राशीत प्रवेश करून, मकर आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव टाकत आहे. हे लक्षात ठेवून, शनीच्या साडेसातीचा प्रभाव खालीलप्रमाणे बदलतो/

मकर राशीवरील साडेसाती

26 जानेवारी 2017 पासून सुरु झाली असून, 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे.

कुंभ राशीवरील साडेसाती

17 जानेवारी 2023 पासून सुरु झाली असून, 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत चालेल.

मीन राशीवरील साडेसाती

17 जानेवारी 2023 पासून सुरु होऊन, 7 एप्रिल 2030 पर्यंत चालेल.

शनीच्या साडेसातीचा प्रभाव

विविध 8 कालावधीत विभागला जातो शनीच्या साडेसातीचा प्रभाव

1. 1 ते 100 दिवस: या प्रारंभिक काळात व्यक्तीला आर्थिक हानी आणि शारीरिक व मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.

2. 101 ते 500 दिवस: हा काळ काहीसा स्थिर असतो. व्यक्तीला व्यवसायात सुधारणा आणि उत्तम आरोग्याचा अनुभव मिळू शकतो.

3. 501 ते 912 दिवस: धार्मिक स्थळांची भेट, ग्रहकलेश आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.

4. 913 ते 1600 दिवस: घर बदलावे लागू शकते, समाजात अपमान सहन करावा लागू शकतो आणि मित्रांशी दुरावा होऊ शकतो.

5. 1601 ते 1825 दिवस: अपमान, कष्ट, रोग आणि आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो.

6. 1826 ते 2300 दिवस: धनप्राप्ती होईल पण दाम्पत्य जीवनात संघर्ष होऊ शकतो.

7. 2301 ते 2500 दिवस: या कालावधीतील प्रभाव चांगला असतो. प्रगती, सौभाग्य आणि कार्यात स्थिरता येते.

8. 2501 ते 2737 दिवस: हा अंतिम काळ कष्ट, आजार, वाद आणि एकाकीपणाने भरलेला असतो. यानंतर साडेसातीचा प्रभाव संपतो.

शनीची साडेसाती ही एक महत्वाची ज्योतिषीय घटना आहे, जी व्यक्तीच्या जीवनात अनेक पैलूंवर परिणाम करते. आपल्या जीवनातील या विशेष काळात, योग्य उपाययोजना आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण शनीच्या प्रभावाशी लढू शकतो. शनीच्या साडेसातीच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक साधना आपल्याला सकारात्मक परिणाम देऊ शकते.

DISCLAIMER :

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या लेखात जी काही माहिती दिली आहे ती ज्योतिषी, पंचांग, ​​धार्मिक ग्रंथ आणि श्रद्धा यावर आधारित आहे. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

Pitru Paksha 2024 : यंदा पितृपक्षाची सुरुवात 17 की 18 सप्टेंबर? वाचा योग्य तारीख

Share this article