थंडीच्या दिवसात आपल्या शरिराला आतमधून गरम ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच किचनमधील काही मसाल्यांच्या मदतीनेही थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Winter Health Care : थंडीच्या दिवसात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी उबदार वस्र घातले जातात. पण शरिराला आतमधून गरम ठेवणेही फार महत्वाचे असते. यासाठी तुम्ही सूप, हिरव्या भाज्या आणि मसाल्यांचा सामावेश आहारात करू शकता. यामुळे शरीर आतमधून गरम राहण्यासह हेल्दी राहण्यास मदत होते. आपल्या किचनमधील असे काही मसाले आहेत ज्याच्या मदतीने थंडीत शरीर आतमधून गमर ठेवण्यासाठी फायदा होईल.
जायफळ
किचनमध्ये वापरल्या जाणारे जायफळ शरिराला आतमधून गरम ठेवण्यास मदत करते. थंडीच्या दिवसात जायफळाचे सेवन करू शकता. यामुळे मेंदू शांत राहण्यासह पचनक्रियाही सुधारली जाते. याचा वापर गोड किंवा खारट पदार्थांमध्ये केला जातो.
जायफळच्या पावडरचा वापर एक ग्लास गरम दूधात मिक्स करु शकता. याशिवाय सूपमध्ये जायफळची पावडर मिक्स केल्याने त्याची चव वाढली जाईल.
हिंग
अन्नपदार्थांची चव वाढवण्याचे काम मीठासह हिंग देखील करते. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ तयार करण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाच्या सेवनामुळे मेटाबॉलिज्म मजबूत राहण्यासह सूजेची समस्या कमी होते.
हिंगाचा वापर डाळ किंवा करीला तडका देण्यावेळी वापरू शकता. याशिवाय उकळत्या पाण्यात आल आणि काळीमीरीसोबत एक चिमूटभर हिंग मिक्स करा. हेच पाणी थंडीच्या दिवसात प्यायल्याने पोटासंबंधित समस्या कमी होतील.
चक्रीफूल
चक्रीफूलाची चव थोडीशी गोडसर असते. याच्या सेवनाने नैसर्गिक रुपात शरीत आतमधून गरम राहण्यास मदत होईल. चक्रीफूलाचा वापर भात किंवा बिर्याणी तयार करताना करू शकता. याशिवाय चहाच्या मसाल्यामध्ये चक्रीफूलाचा वापर करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास दिसू लागतात हे 5 संकेत
वयाच्या 40 नंतर महिलांनी डाएटमध्ये करा या 6 पोषण तत्त्वांचा समावेश, रहाल हेल्दी