वयाच्या 40 नंतर महिलांनी डाएटमध्ये करा या 6 पोषण तत्त्वांचा समावेश, रहाल हेल्दी

वयाच्या चाळीशीनंतर आरोग्यासंबंधित समस्या अधिक वाढू लागतात. याच कारणास्तव हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी महिलांनी आपल्या डाएटमध्ये काही पोषण तत्त्वांचा समावेश करावा. जेणेकरुन हाडांसह स्नायूंना बळकटी मिळेल. 

Health Care After Age of 40 : वय वाढण्यासह शरिरात काही बदल होऊ लागतात. याचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक झाल्याचे दिसून येते. वाढत्या वयासह खासकरुन वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरिरात काही बदल होऊ लागतात. यादम्यान काही महिला प्री मेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या स्थितीचा सामना करू लागतात. एवढेच नव्हे वाढत्या वयासह महिलांच्या शरिरात पोषण तत्त्वांची कमतरता निर्माण होऊ लागते. यामुळे स्नायू आणि हाडांचे दुखणे सुरू होते. अशातच वयाच्या 40 नंतर महिलांनी आपल्या डाएटमध्ये कोणत्या पोषण तत्त्वांचा समावेश करावा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी


वाढत्या वयासह महिलांची हाडं आणि स्नायू कमकुवत होण्यास सुरुवात होते. अशातच महिलांनी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरिरातील हाडांना फायदा होतो आणि त्यासंबंधित समस्या दूर होतात.

मॅग्नेशियम


महिलांना हेल्दी राहण्यासाठी मॅग्नेशियमची देखील गरज भासते. शरिरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू लागतात. मॅग्नेशियमयुक्त फूड्सचा डाएटमध्ये समावेश केल्यास स्नायूंचे दुखणे कमी होणे, शरिरातील हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते.

ओमेगा-3


वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी ओमेगा-3 चे सेवन करणे महत्वाचे आहे. हे हेल्दी फॅट्स शरिराला उर्जा दण्यास मदत करतात. ओमेगा-3 च्या सप्लिमेंट्स मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे सेवन करावे. ओमेगा-3 युक्त फूड्समुळे शरिराला येणारी सूज कमी होण्यास मदत होते.

प्रोटीन


महिलांना अन्य पोषण तत्त्वांसह पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणेही महत्वाचे आहे. यामुळे शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि हेल्दी राहण्यास मदत होते. याशिवाय मेटाबॉलिज्मही बूस्ट होते.

कोलेजन


त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी शरिरात कोलेजनच्या स्तर योग्य प्रमाणात असणे महत्वाचे असते. एखाद्या महिलेच्या शरिरात कोलेजनचे प्रमाण कमी झाल्यास त्वचेसह संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. कोलेजनमुळे नख आणि स्नायूंच्या आरोग्याला फायदा होतो.

अन्य पोषण तत्त्वे


वयाच्या चाळीशीनंतर हेल्दी आणि अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी नेहमीच डाएटमध्ये वेगवेगळ्या पोषण तत्त्वयुक्त फूड्सचा समावेश करावा. डाएटमध्ये लोह, प्रोबायोटिक्स, व्हिटॅमिन्सचाही समावेश करावा. हे सर्व पोषण तत्त्वे संपूर्ण आरोग्यासह मानसिक आरोग्यासाठीही महत्वाची असतात.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास दिसू लागतात हे 5 संकेत

रोगप्रतिकारक शक्ती ते वजन कमी करण्यासाठी दररोज खा Sprouted Moong

Share this article