
मुंबई : व्हिस्की प्रेमींसाठी प्रत्येक बाटलीचा एक वेगळाच अनुभव असतो. त्यात जर अवॉर्ड जिंकलेली प्रीमियम ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल, तर तिची डिमांड आणखीनच वाढते. 2026 मध्ये अशाच काही ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, Chivas Regal 25 Year Old, Royal Salute 21 Year Old, Wildmoor Black Mountain 40 Year Old, Ballantine's 21 Year Old आणि White Heather 21 Year Old या व्हिस्कींनी 2026 च्या IWSC अवॉर्ड्समध्ये बाजी मारली आहे. या सगळ्यांच्या किंमती, अल्कोहोलचं प्रमाण (ABV) आणि चवीमध्ये खूप फरक आहे.
या लिस्टमध्ये Chivas Regal 25 Year Old चं नाव आघाडीवर आहे. भारतात याची किंमत साधारण ₹37,000 च्या घरात आहे. 2026 च्या IWSC मध्ये या व्हिस्कीने 97 पॉइंट्स मिळवत 'Spirit Gold' अवॉर्ड जिंकलाय. यात ABV 40% आहे. चवीबद्दल बोलायचं तर, यात फळं, मनुका आणि सफरचंदाच्या सुगंधासोबतच क्रीमी पोरीज, ओक, टॉफी आणि हलक्या मसाल्यांचे नोट्स मिळतात.
Royal Salute 21 Year Old The Signature Blend ही आणखी एक प्रीमियम ब्लेंडेड स्कॉच आहे. भारतात याची अंदाजे किंमत ₹19,500 ते ₹24,350 च्या दरम्यान आहे. 2026 च्या IWSC मध्ये 96 पॉइंट्ससह यानेही 'Spirit Gold' अवॉर्ड पटकावलाय. यात 40% ABV आहे. ड्रायफ्रुट्स, मँडरीन, कॅरमेल, ब्राऊन शुगरचा गोडवा आणि डार्क चॉकलेटची चव यात प्रकर्षाने जाणवते.
40 वर्षे जुनी असल्यामुळे Wildmoor Black Mountain 40 Year Old विशेष लक्ष वेधून घेते. भारतात याची किंमत तब्बल ₹1 लाख ते ₹1.10 लाखांपर्यंत आहे. 2026 च्या IWSC मध्ये 96 पॉइंट्स मिळवून याने 'Spirit Gold' अवॉर्ड जिंकलाय. यात ABV 46% आहे. रममध्ये भिजवलेले मनुके आणि डार्क चॉकलेटचे नोट्स याच्या चवीत मिळतात. शेवटी एक मस्त गोडवा रेंगाळत राहतो, असं रिपोर्टमध्ये म्हटलंय.
प्रीमियम ब्लेंडेड व्हिस्कीमध्ये Ballantine's 21 Year Old हे आणखी एक मोठं नाव. भारतात याची किंमत ₹14,800 ते ₹20,000 च्या आसपास आहे. यात 40% ABV आहे. मध, पिकलेलं सफरचंद आणि फुलांच्या सुगंधासोबतच हलका ओक मसाला आणि स्मूथ माल्ट फिनिश ही याची खासियत आहे.
या लिस्टमध्ये White Heather 21 Year Old ही व्हिस्कीसुद्धा लक्षवेधी आहे. भारतात याची किंमत ₹14,000 ते ₹16,000 च्या दरम्यान आहे. 2026 च्या IWSC मध्ये 95 पॉइंट्ससह याने 'Spirit Gold' अवॉर्ड मिळवलाय. यात ABV 48% आहे. ऑर्चर्ड फळं, क्रीम कॅरमेल, जिंजरब्रेड, शॉर्टब्रेड आणि हलक्या मसाल्यांचे नोट्स यात मिळतात. शेवटी थोडासा पीट स्मोकचा (धुराचा) फीलही येतो.
या पाचही ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कींच्या किंमतीत मोठी तफावत आहे. Ballantine's 21 Year Old आणि White Heather 21 Year Old साधारण ₹14 हजारांपासून सुरू होतात, तर Wildmoor Black Mountain 40 Year Old ची किंमत ₹1 लाखाच्या पुढे जाते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतातील व्हिस्कीच्या किंमती राज्यांचे टॅक्स, शहर, विक्रेता, बाटलीची साईझ, उपलब्धता आणि इम्पोर्ट ड्युटीनुसार बदलू शकतात. वर दिलेल्या किंमती या रिपोर्टवर आधारित अंदाजे रिटेल किंमती आहेत.