YouTube ने भारतात आपला नवीन 'प्रीमियम लाईट' प्लॅन ₹८९ मध्ये लॉन्च केला आहे, ज्यामुळे वापरकर्ते जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहू शकतील. या स्वस्त प्लॅनमध्ये यूट्यूब म्युझिक, ऑफलाइन डाउनलोड आणि बॅकग्राउंड प्ले सारखी फीचर्स मिळणार नाहीत.
YouTube Premium Lite भारतात लॉन्च होणार, प्लॅन ऐकून व्हाल खुश
भारतात युट्युबने आपला नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्रीमियमचं मासिक शुल्क १४९ असून प्रीमियम लाईट शुल्क हे ८९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ही किंमत युट्युब स्टुडंट प्लॅनसारखी आहे.
26
युट्युबने प्रीमियम लाईट प्लॅन केला लॉन्च
युट्युबने भारतात प्रीमियम लाईट प्लॅन लॉन्च केला आहे. युट्युब प्रीमियम महाग असल्यामुळे अनेक लोक तो खरेदी करत नव्हते. ते आता नवीन प्लॅन खरेदी करू शकणार आहेत.
36
आधी युट्युब प्रीमियम कितीला होता?
आधी युट्युब प्रीमियम हा १४९ रुपयांमध्ये भारतामध्ये उपलब्ध होता. आता तो केवळ ८९ रुपयांमध्ये मिळणार आहे. हा प्लॅन स्टुडंट प्लॅनसारखा असून त्यामुळे लोक जाहिरातींशिवाय व्हिडीओ पाहू शकणार आहेत.
प्रीमियम लाईट प्लॅन हा प्रिमिअम प्लॅन पेक्षा वेगळा असून त्यामध्ये आपल्याला कमी सुविधा मिळणार आहेत. हा प्लॅन मोबाईल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीसह जवळजवळ सर्व डिव्हाइसवर वापरला जाऊ शकतो.
56
कोणते फीचर्स कमी मिळतील?
अर्थात हा प्लॅन स्वस्त आहे, परंतु YouTube प्रीमियमच्या तुलनेत यात काही कमतरता देखील असतील. यूट्यूब प्रीमियम आणि यूट्यूब प्रीमियम लाइटमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्याला यूट्यूब म्युझिकचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही.
66
YouTube शॉर्ट्स मध्ये जाहिराती दिसतील
YouTube शॉर्ट्स आणि शोध परिणामांमध्ये जाहिराती दिसतील. याशिवाय या प्लॅनमध्ये ऑफलाइन डाउनलोड किंवा बॅकग्राउंड प्ले सारख्या फीचर्स समाविष्ट केल्या जाणार नाहीत.