शिक्षण मंत्री म्हणून या नेत्यानं स्वीकारली जबाबदारी, जाणून घ्या माहिती

vivek panmand   | SIGWIRE
Published : Jul 25, 2026, 09:01 PM IST
Pralhad Joshi

सार

वाढत्या दबावानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, नवीन शिक्षणमंत्र्याची घोषणा होईपर्यंत प्रल्हाद जोशी यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. आज प्रधान यांनी शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर हि घोषणा करण्यात आली आहे.

शिक्षण खात्याची जबाबदारी? 

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. आता ते शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. भविष्यात शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा केल्यावर त्यांच्याकडून या पदाचा कारभार काढून घेण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

प्रल्हाद जोशी कोण आहेत? 

प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड येथून खासदार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. आता पुढील काळ त्यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. धर्मेंद्र यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Kharge Caste Row: ज्या स्टेजवरून खर्गे बोलले, ते 'शुद्ध' केलं; अखेर खासदारांच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
ISRO Privatization: 'काळजी करू नका, नोकरी जाणार नाही'; चेअरमननी थेट कर्मचाऱ्यांशी साधला संवाद