Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांच्याकडं किती आहे संपत्ती, आकडा वाचून व्हाल थक्क

vivek panmand   | SIGWIRE
Published : Jul 25, 2026, 04:10 PM IST
Dharmendra Pradhan

सार

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्या संपत्तीची चर्चा आहे. त्यांच्याकडे २.४७ कोटींची सेव्हिंग, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी असून त्यांच्या पत्नीकडे त्यांच्यापेक्षा जास्त सोने आणि चांदी आहे. प्रधान यांच्या नावावर ओडिसामध्ये शेतजमीनही आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा घेण्यात यावा म्हणून विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरु केले होते. त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून राजीनामा घेण्यासाठी दबाव आणण्यात येत होता. धर्मेंद्र प्रधान यांना ओडिसा राज्यातील भाजपचे नेते म्हणून ओळखलं जात. आज आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

किती आहे संपत्ती? 

धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे एकूण सेव्हिंग अमाऊंट हि २.४७ कोटी रुपये आहे. त्यांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. त्यामध्ये त्यांनी ८०.४० लाख रुपये गुंतवले आहेत. जीवन विमा पॉलिसीत ६७.७२ लाखांची गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर २०११ ची मॉडेल होंडा सिटी हि गाडी आहे. तसेच पत्नीच्या नावावर कर्मशिअल वाहन आहे.

सोने आणि चांदीत किती आहे गुंतवणूक? 

सोने आणि चांदी यात गुंतवणूक धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली आहे. त्यांच्याकडे २०० ग्रॅम सोने म्हणजेच २० तोळे आणि चांदी हि २.५ किलोग्रॅम आहे. त्यांच्या पत्नीकडे ५०० ग्रॅम सोने म्हणजेच ५० तोळे सोने आणि १० किग्रॅ चांदी आहे. त्यांच्या पत्नीकडे जास्त दागिने असल्याचं दिसून येत. धर्मेंद्र यांच्याकडे ओडिसामध्ये १२ लाख रुपयांची शेतजमीन आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP च्या विजयाचा दावा; 'लोकशाहीचा विजय', अभिजित दीपके यांची पहिली प्रतिक्रिया
"थँक्यू फ्रेंन्ड्स...", विक्रमी प्रतिसादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास व्हिडिओ मेसेज (Watch Video)