उपोषण जंतर मंतरवर जाऊन सोडायला हवं होतं, सोनम वांगचुक यांना कोणी दिला सल्ला

Published : Jul 24, 2026, 07:53 PM IST
sanjay raut

सार

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वांगचुक यांनी जंतर मंतरवर जाऊन उपोषण सोडायला हवे होते, असे राऊत म्हणाले. त्यांनी विरोधी पक्षांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचाही उल्लेख केला.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उपोषण सोडायचंच होत तर जिथून त्याची सुरुवात केली तिथं जाऊन सोडायला हवं होत. जंतर मंतरवर जाऊन त्यांनी उपोषण सोडलं असत तर ते अजून मोठे झाले असते असं राऊत यांनी म्हटलं आहे.

राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत यांनी बोलताना म्हटलं आहे की, २६ दिवसांपासून वांगचुक हे उपोषणाला बसले होते. त्यांचं जीवन हे देशासाठी महत्वाचं आहे. त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलं आहे. शिक्षणासहित अनेक महत्वाच्या मुद्यांवर त्यांचं देशासाठी महत्वाचं योगदान राहील आहे. त्यांना पोलिसांनी जिथून उचललं होतं तिथं जाऊन त्यांनी उपोषण सोडवायला हवं होतं.

आंदोलनाला ताकद देण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं 

या आंदोलनाला ताकद देण्याचं काम हे विरोधी पक्षांनी केलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काठ्या खाल्यात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहेत. उत्तर प्रदेशात डिम्पल यादव आणि अखिलेश यादव हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमची मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, चिदंबरम यांची मागणी
Hoskote Transport Hub: एक्सप्रेसवे, हाय-स्पीड ट्रेन आणि मेट्रो; होसाकोटे बनतंय बंगळुरूचं नवं ट्रान्सपोर्ट गेटवे