Gujarat Floods: १६ तासांत ११०० मिमी पाऊस, पार्किंगमधल्या ५० गाड्या पाण्याखाली

Published : Jul 24, 2026, 05:17 PM IST
Gujarat Floods: १६ तासांत ११०० मिमी पाऊस, पार्किंगमधल्या ५० गाड्या पाण्याखाली

सार

गुजरातच्या वलसाडमध्ये मुसळधार पावसामुळे एका बिल्डिंगच्या पार्किंगमधील ५० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

अहमदाबाद: गुजरातच्या वलसाडमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एका मोठ्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल ५० गाड्या पाण्यात बुडाल्याचं दिसतंय. एका उंच इमारतीवरून काढलेल्या या व्हिडिओमध्ये पार्किंग एरिया पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे आणि गाड्यांच्या खिडक्यांपर्यंत पाणी पोहोचलं आहे. फक्त पार्किंगच नाही, तर आजूबाजूचा परिसरही पूर्णपणे जलमय झाला आहे.

गुजरातच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. याचा सर्वाधिक फटका राज्याच्या दक्षिणेकडील वलसाड जिल्ह्याला बसला आहे. वलसाडच्या उमरगाव तालुक्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या १६ तासांत तब्बल ११०० मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. उमरगाव व्यतिरिक्त वलसाडच्या इतर तालुक्यांमध्येही याच काळात ६०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. परिस्थिती गंभीर बनल्याने पूरग्रस्त भागातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

जोरदार पावसामुळे औरंगा, पार आणि दमनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, ज्यामुळे वलसाडमध्ये मोठी पूरस्थिती निर्माण झाली. सुरत शहरातील सखल भागांमध्येही पाणी शिरल्याने प्रशासनाने दोन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे.

भारतीय हवामान खात्याने दक्षिण गुजरातच्या वलसाड, नवसारी, डांग, सुरत आणि तापी जिल्ह्यांमध्ये उद्याही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती निवारण दलाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदतकार्य वेगाने करण्यासाठी मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे. आवश्यक मार्गदर्शन आणि कामात समन्वय साधण्यासाठी मंत्री पूरग्रस्त भागांमध्ये तळ ठोकून आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Supreme Court On Election Commission: मतदानाचा हक्क कायमचा हिरावून घेता येईल का? ४३ लाख मतदार गेले कुठे? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Raj Thackeray Karjat Speech | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | Karjat Torrent