Himachal Landslide : हिमाचलमध्ये भीषण घटना, चालत्या टॅक्सीवर डोंगरकडा कोसळला; १३ जणांचा मृत्यू

Published : Jul 24, 2026, 06:58 PM IST
Himachal Landslide 13 Killed

सार

Himachal Landslide 13 Died : हिमाचलमध्ये चालत्या टॅक्सीवर डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शिमला : हिमाचल प्रदेशमधल्या लाहौल-स्पिती जिल्ह्यातून शुक्रवारी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथल्या उदयपूर-किलाड रस्त्यावर कडू या नाल्याजवळ अचानक डोंगरकडा कोसळला. डोंगरकडा कोसळल्यानंतर या रस्त्यावर कुल्लूवरून पांगीकडे जाणारी एक टॅक्सी थेट ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर-किलाड रस्ता आदल्या दिवशीच दरड कोसळल्यामुळे बंद होता. शुक्रवारी रस्ता पुन्हा सुरू झाल्यावर ही टॅक्सी पांगीच्या दिशेने निघाली. पण, कडू नाल्याजवळ पोहोचताच अचानक डोंगराचा मोठा भाग वेगाने रस्त्यावर कोसळला. काही क्षणातच संपूर्ण टॅक्सी डोंगराच्या ढिगाऱ्याखाली दबली. हा अपघात इतका अचानक घडला की टॅक्सीमध्ये बसलेल्या लोकांना कोणती कृती करण्यास वेळही मिळाला नाही.

 

 

१३ जणांचा मृत्यू

लाहौल-स्पितीच्या पोलीस अधीक्षक शिवानी मेहला यांनी या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याची महिती दिली आहे. माहिती मिळताच तिंदी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बचाव पथकाकडून आतापर्यंत एका जखमी व्यक्तीला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे, मोठा ढिगारा हटवण्यासाठी मशीनची मदत घेतली जात आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सतत पडणारा पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे डोंगराळ भागातील प्रवास अतिशय धोकादायक ठरत आहे. त्यामुळे, लोकांनी हवामान आणि रस्त्यांच्या स्थितीची माहिती घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

धर्मेंद्र प्रधान जाणार? CJPच्या मागणीवर सरकारची मोठी हालचाल | CJP | Meeting | Protest
Gujarat Floods: १६ तासांत ११०० मिमी पाऊस, पार्किंगमधल्या ५० गाड्या पाण्याखाली