बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट तीव्र झाले असून यामुळे लोकांच्या रोजच्या जगण्यातील पाण्याच्या वापरावर मर्यादा येत आहेत.
बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट तीव्र झाले असून यामुळे लोकांच्या रोजच्या जगण्यातील पाण्याच्या वापरावर मर्यादा येत आहेत. बंगळुरूमधील रहिवाशांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे येथे पाण्याचे सोर्स कमी होत असून त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर मर्यादित करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सगळीकडे पाण्याची अनुपलब्धता जाणवत असून त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.
येथील आयटी कंपन्यांना त्यामुळे वर्क फ्रॉम होम अशा स्वरूपाचे काम देण्यात यावे अशी सूचना देण्यात अली आहे. त्यामुळे पाण्याचा त्रास काही अंशी कमी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. बंगळुरूमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम स्वरूपाचे काम दिल्यास येथील लोकसंख्या कमी होणार असून शहरातील लोकसंख्येवरील पाण्याचा त्रास कमी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कर्नाटक सरकारने पाणी कमी असून त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यात यावे अशा प्रकारची सूचना देण्यात आली होती. सध्या जलतज्ज्ञ यांनी येथील पाण्याची टंचाई कमी करायची असेल तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीचे काम देण्यात यावे अशी विनंती केली होती, ती विनंती मान्य केल्यास येथील लोकसंख्या कमी होऊन पाण्याचा वापर कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा -
भाजपने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा यांना दिले लोकसभेचं तिकीट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवाराला केला कॉल
भावाच्याच पोटच्या पोरीची बहिणीने केली हत्या...बदल्याची आग मनात ठेऊन केले कृत्य