भावाच्याच पोटच्या पोरीची बहिणीने केली हत्या...बदल्याची आग मनात ठेऊन केले कृत्य

भावाने बहिणीला प्रेम संबंध राखण्यासाठी टोकले म्हणून भावाचा राग मनात बाळगून बहिणीने भावाच्या अडीच वर्षाच्या पोटच्या पोरीची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात घडली आहे. जाणून काय आहे नेमकं प्रकरण

21 वर्षाच्या बहिणीला प्रेम संबंधांपासून पासून अडवणे 30 वर्षीय भावाला अत्यंत महाग पडले आहे. भावाच्या अडवण्याने बहिणीने भावाच्या पोरिलाचीच केली हत्या. हि घटना राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेचा तपास रतनगड पोलीस करत असून जलेऊ गावात हि घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, इंद्रजीत पारीकने काही दिवसांपूर्वी त्याच्या बहिणीला शेजारच्या मुलासोबत पहिले होते. यावर त्याने तिची समजूत देखील काढली असे परक्या व्यक्तीला भेटणे बोलणे चांगले नाही. परंतु तिने भावाचे ऐकले नाही. भावाने रागावले म्हणून तोच राग मनात धरला आणि भावाचा बदल घेण्याचा निश्चय केला.

भावाला धडा शिकवण्यासाठी मायाने त्याची अडीच वर्षांची मुलगी समृद्धीला संपवण्याचा मार्ग अवलंबला. संपूर्ण कुटुंब होळी खेळत होते. दरम्यान समृद्धी देखील घरासमोर होळी खेळत होती. घरात कोणी नसताना मायाने संधी पाहून घरात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडवून तिचा निर्घृणपणे खून केल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घराजवळील जनावरांच्या चाऱ्याच्या परिसरात लपवून ठेवला होता. होळी खेळता खेळता समृद्धी अचानक गायब झाल्याने सगळीकडे तिचा शोध घेतला. मात्र ती सापडली नाही म्हणून घरच्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना मृतदेह सापडला. शेजार्यांकडे लावलेल्या सीसीटीव्ही ही संपूर्ण बाब उघडकीस आली. मायानेच खून केल्याचे दिसून आले.संपूर्ण परिवार होळीचा आनंद घेत असताना हि घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी मायाला कोठडीत घेतले असून तिची चौकशी सुरु आहे.

आणखी वाचा :

होळीच्या दिवशी दिल्लीत नवऱ्याने चिरला बायकोचा गळा, पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर बायको दिसली रक्ताच्या थारोळ्यात

Share this article