वाराणसी लोकसभा निवडणूक निकाल २०२४: लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना तिकीट दिले आहे, तर २०१९ मध्ये पराभूत झालेले उमेदवार अजय राय यांना काँग्रेसने दुसरी संधी दिली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना तिकीट दिले आहे, तर २०१९ मध्ये पराभूत झालेले उमेदवार अजय राय यांना काँग्रेसने दुसरी संधी दिली आहे. वाराणसीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अजय राय आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून चांगली आघाडी घेत आहेत. नरेंद्र मोदींचा विजय निश्चित असल्याचा दावा लोकांमधून केला जात असून, फरकाचा आकडा वाढवण्यावरच भर दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३३,२०६ मतांची घेतली आघाडी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३३,२०६ मतांनी आघाडीवर असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय हे उमेदवार आहेत. पंतप्रधान आधीच्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर गेले होते पण आता ते परत आघाडीवर आल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात सर्वात जास्त लीडने निवडून येतील का, हा प्रश्न जनतेला पडला आहे.
वाराणसी लोकसभा निवडणुकीबद्दल -
वाराणसी लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये १८,५६,७९१मतदार होते, तर २०१४ मध्ये १७,६६,४८७ मतदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काशीच्या जनतेने भाजपचे उमेदवार आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत देऊन खासदार म्हणून निवडून दिले. २०१९ मध्ये मोदींना ६,७४,६६४ मते मिळाली होती, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवार शालिनी यादव १,९५,१५९ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होत्या. सपा उमेदवाराचा मोदींकडून ४,७९,५०५ मतांनी पराभव झाला. त्याचवेळी काशीच्या जनतेने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ५,८१,०२२ मते देऊन विजयी केले. आपचे उमेदवार आणि दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २,०९,२३८ मते मिळाली होती.