112
भीषण ढगफुटी
उत्तराखंडच्या उत्तरकाशीत भीषण ढगफुटी आणि भूस्खलन झालं. धराली गाव उद्ध्वस्त. ढगफुटीचा व्हिडिओ धक्कादायक आहे.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 212
एनडीआरएफ पथके घटनास्थळी
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले, हर्सिलजवळील धरालीत ढगफुटी झाली आहे. NDRF आणि SDRF ची पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
312
गावात पाणी आणि चिखल
गावात पाणी आणि चिखल शिरला आहे. अनेक लोक अडकल्याची भीती आहे. मृतांची अधिकृत माहिती नाही. ६० लोक वाहून गेल्याची शक्यता.
412
बचावकार्य सुरु
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. बचावकार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
512
गंगोत्रीला जाणारा रस्ता बंद
धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे गंगोत्री धामला जाणारा रस्ता बंद झाला आहे. ४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
612
पुरात वाहून आले दगड
ढगफुटीमुळे पाणी आणि दगडांचा पूर आला. धराली गाव पाण्याखाली गेलं आहे. बचावकार्य सुरू आहे.
712
नदी धोक्याच्या पातळीवर
गंगाजीचं हिवाळी स्थान मुखबा आणि गंगोत्री धाम यांच्याजवळ ही घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये गंगा आणि काळी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत.
812
घरे, झाडे वाहुन गेली
प्रवाशांनी व्हिडिओ शूट केला आहे. त्यात डोंगरावरून पाण्याचा पूर येताना दिसत आहे. अनेक घरे आणि झाडे वाहून गेली.
912
खीर गड नदीला पूर
हर्सिल परिसरात खीर गड नदीला पूर आला आहे. उत्तरकाशी पोलीस, SDRF, NDRF, आर्मी आणि इतर बचाव पथकं मदतकार्य करत आहेत.
1012
रस्ते झाले बंद
रस्ते बंद असल्याने आणि मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. गंगोत्री धामशी संपर्क तुटला आहे.
1112
शाळा, अंगणवाड्या बंद
हिमालयीन राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. डेहराडूनमध्ये शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
1212
एकूण ३१० रस्ते बंद
हिमाचल प्रदेशातही मुसळधार पावसामुळे ३१० रस्ते बंद झाले आहेत.