Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय

Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय

Published : Nov 22, 2026, 07:02 PM IST

ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी वडिलांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. गेल्या ५४ दिवसांतील घडामोडी आणि पुरावे संबंधित नेत्यांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचे आश्वासन मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. पाचवा आरोपी म्हणून समोर आलेल्या अमित सिंग उर्फ पपलूबाबत संशय व्यक्त केल्यानंतरच पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतल्याचे राम पूर्णेकर म्हणाले. मानपाडा परिसरात संशयास्पद बंदूकधारी व्यक्ती दिसल्याच्या माहितीनंतर पोलीस चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त करत कॉल रेकॉर्डिंग आणि छायाचित्रांसंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.