
नागपूरमधील दुष्काळग्रस्त लोहारी सावंगा गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावात मुक्काम, शेतकरी कुटुंबासोबत जेवण, भजनात सहभाग आणि दुसऱ्या दिवशी उन्हात शेतांची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोहोचत असल्याचा संदेश या भेटीतून देण्याचा प्रयत्न झाला. महिलांसाठी ही भेट भावनिक ठरली, तर शेतकऱ्यांना सरकार आपल्या दारी आल्याचा अनुभव मिळाला. आता प्रत्यक्ष मदत आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांमधून हा विश्वास किती टिकतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.