Ayodhya Ram Mandir :अयोध्येतील राम मंदिरासाठी तामिळनाडूतून तब्बल 42 घंटा पाठवण्यात आल्या आहेत. या सर्व घंटांचे वजन बाराशे किलोग्रॅम इतके असल्याचे म्हटले जात आहे. या घंटांची भाविकांनी मनोभावे पूजा देखील केली.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्याचे 22 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जोरदार तयारी देखील सुरू आहे. मंदिर उभारणीचे कार्य जलदगतीने सुरू आहे.
यादरम्यान रविवारी (24 डिसेंबर 2023) तामिळनाडूतून श्री राम मंदिरासाठी तब्बल 42 घंटा पाठवण्यात आल्या. या मोठमोठ्या आकारातील या सर्व घटांचे वजन जवळपास बाराशे किलोग्रॅम असल्याची माहिती आहे.
यासह पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या आकारातील घंटी देखील पाठवण्यात आल्या आहेत.
‘जय श्री राम’चा जयघोष
पंडितांकडून घंटांची विधिवत पूजा करून त्यावर फुलांच्या माळा देखील अर्पण करण्यात आल्या. यावेळी भाविकांनीही घंटांची मनोभावे पूजा केली. तामिळनाडूमध्ये तयार करण्यात आलेल्या घंटा राम मंदिरात बसवल्या जाणार आहेत.
यामुळे येथील लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंदाचे भाव पाहायला मिळाले. भाविकांनी यावेळेस ‘जय श्री राम’ असा जयघोषही केला.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण
Makrana Marble : राम मंदिर उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या दगडाची किंमत माहितीये?
AYODHYA राम मंदिरातील अखंड ज्योतीसाठी खास तूप कुठून मागवले जाते?
Exclusive : रामसेवेसाठी संपूर्ण जीवन केले समर्पित, सरकारी नोकरीही गमावली! जाणून या रामभक्ताची कहाणी
AYODHYA RAM MANDIR : राम मंदिरासाठी या पुजाऱ्यांची झाली निवड