दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
1. Maharashtra Budget 2024 : राज्य अर्थसंकल्पातील 20 महत्त्वाच्या घोषणा, वाचा एका क्लिकवर
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याच्या एकूण खर्चापैकी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पातून सरकारने महिला, शेतकरी, वारकरी यांच्यासह विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाचीही स्थापना करण्याचं जाहीर करण्यात आले आहे.
2. अजित पवारांकडून गिफ्ट, MMRDA क्षेत्रात 'टॅक्स' कमी केल्यानंतर पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार
देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पूर्ण केली होती, त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जाते. महागाईच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात महायुती सरकारला तर केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर 100 रुपयांच्या आत आले आहे. मात्र अद्यापही पेट्रोल व डिझेल दरवाढीवरुन राज्य सरकारने कर कमी करावा अशी मागणीही केली जाते. आता राज्य सरकारने मुंबईसह एमएमआरडीच्या क्षेत्रातील पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होणार आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी 10 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.
शुक्रवारी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान संसदेत प्रचंड गदारोळ झाला. संसदेत, अधिवेशन सुरू होताच, राहुल गांधींनी NEET परीक्षेवर चर्चेची मागणी केली, तेव्हा सभापती म्हणाले की प्रथम सर्व सदस्यांनी त्यांच्यासमोर त्यांची नावे आणि पत्रके ठेवावीत. राहुल यांनी चर्चेसाठी दोन मिनिटांचा वेळ मागितल्यावर सभापतींनी पुन्हा आपला मुद्दा मांडला, त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरू केला. त्यावर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ आणि गदारोळ सुरू केला.
NEET UG परीक्षेबाबत देशभरात गोंधळ सुरू आहे. गुन्हे शाखेशिवाय दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरात या प्रकरणाचा तपास सुरू असून संशयितांना पकडले जात आहे. आता या प्रकरणात राजस्थानची तारही गुंतली आहे. राजस्थानच्या झालवाड जिल्ह्यात असलेल्या मेडिकल कॉलेजच्या दहा विद्यार्थ्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही मुलींचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांनी लाखो रुपये घेऊन डमी उमेदवार बनून नंतर इतर ठिकाणी परीक्षा दिल्याचा आरोप होत आहे.
6. पावसाने दिल्ली शहरावर आणले संकट, दिल्लीच्या अनेक भागात पाणी भरल्यामुळे वाहने अडकली, Watch Video
मुसळधार पावसामुळे उष्णतेशी झगडणाऱ्या दिल्लीतील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्लीतील पहिल्याच पावसात यंत्रणा उघड झाली आहे. येथील पावसामुळे मुख्य रस्ते आणि अनेक भागात पाणी साचले आहे. परिस्थिती अशी आहे की अनेक वस्त्यांमध्ये लोकांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. गुडघाभर पाण्यामुळे त्यांना घरातच राहावे लागले आहे.
'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात अन् भक्तिमय अशा आनंदमय वातावरणात देहूनगरी न्हाहून निघाली आहे. वारकरी, नागरिक असा लाखोंचा मेळा इंद्रायणी काठी अवतरला आहे. नागरिक इंद्रायणीत स्नान करून तुकोबांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागलेत. देहूत दिंड्याही मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत.
8. झारखंडमधून मोठी बातमी, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन
झारखंड उच्च न्यायालयाने शुक्रवारी (28 जून) माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या दोन जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला.
9. मुंबईत आईस्क्रिममध्ये आढळलेल्या मानवी बोटाचे गूढ उलगडलं, डीएनए चाचणीतून माहिती आली समोर
मालाड परिसरात एका आईस्क्रिम कोनमध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडले आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना हे बोट कुणाचे याचा शोध लागला आहे. हे बोट आईस्क्रिम फॅक्टरीत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मानवी बोटाचे डिएनए टेस्ट केले होते. त्यातून कापलेले बोट हे त्याच कर्मचाऱ्याचे असल्याचे समोर आले आहे जो पुण्यातील इंदापूर येथे आईस्क्रिम फॅक्टरीत काम करतो.
भारताचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला बोहल्यावर चढणार आहे. राधिका मर्चंट हिच्याबरोबर सात फेरे घेऊन अनंत अंबानी आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवणार आहे. नीता अंबानी देखील मुलाची लग्न पत्रिका घेऊन काशी विश्वानाथ मंदिरात पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी वाराणसीत गंगा आरती केली. तसेच त्यांनी लाडक्या मुलाच्या लग्नासाठी साड्या देखील खरेदी केल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.