राजकारणापासून मनोरंजनापर्यंत, 11 ऑगस्टच्या महत्वाच्या टॉप 10 बातम्या

Published : Aug 11, 2024, 07:16 PM ISTUpdated : Aug 12, 2024, 08:41 AM IST
top 10 news

सार

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना नवीन पीक वाणांची भेट दिली, तर दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मनोरंजन विश्वातूनही काही धक्कादायक बातम्या समोर आल्या आहेत.

  1. पीएम मोदींनी शेतकऱ्यांना 109 नवीन पीक वाण दिले भेट, सेंद्रिय शेतीवर केली चर्चा

पंतप्रधान मोदींनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. त्यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले आणि नवीन पिकांच्या वाणांवर चर्चा केली.

2. राज्य सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून संपावर, सर्वसामान्यांची होणार गैरसोय

राज्य सरकारी कर्मचारी येत्या 29 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यभरातील 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

3. शेतकऱ्यांच्या उत्पन्नऐवजी आत्महत्या दुप्पट, सत्ता बदलण्याची गरज : शरद पवार

मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याचे शरद पवारांनी म्हटले. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसल्याचे सांगत त्यांनी जोरदार टीका केली आहे.

4. दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण, नितेश राणेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी जरांगेंवर केलेल्या टीकेला जरांगेंनी प्रत्युत्तर दिले. नितेश राणे हे फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत असे वक्तव्य जरांगेंनी केले. मराठा आरक्षणासाठी राज्यभर शांतता फेरी काढत असल्याचेही जरांगेंनी सांगितले.

5. ठाण्यातील हल्ल्यानंतर मनसे आक्रमक; संदीप देशपांडे म्हणाले...

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून, संदीप देशपांडे यांनी या कृतीचे समर्थन केले आहे. त्यांनी ठाकरे गटाला निर्वाणीचा इशारा देत तुम्ही आरे केले तर आम्ही कारे करणारच, असे म्हटले आहे.

7. हिंडेनबर्ग अहवालावर अदानीचे सडेतोड प्रत्युत्तर, काय म्हणाले सेबी प्रमुखांबद्दल 

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या नवीन आरोपांना अदानी समूहाने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावत ते निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.

8. UPI मध्ये मोठी सुधारणा, कर भरणा आणि 'प्रतिनिधी देयके' मध्ये बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI वापरकर्त्यांसाठी दोन महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. कर भरण्याची मर्यादा वाढवून ₹5 लाख करणे आणि 'प्रतिनिधी देयके' वैशिष्ट्य सादर करणे.

9. 'शाहरुख तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती', Viral व्हिडीओवर नेटकरी संतप्त

Shah Rukh Khab Viral Video : फिल्म फेस्टिव्हलवेळी रेड कार्पेटवर शाहरुख खानने एका वृद्ध व्यक्तीला धक्का दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळेच शाहरुखवर टीका केली जात आहे.

10. Pushpa 2 सिनेमातील आयटम सॉन्गसाठी समंथा नव्हे या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी सिनेमा पुष्पा-2 सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होणार आहे. अशातच सिनेमातील आयटम सॉन्गमध्ये समंथा दिसणार नाही. यामुळे दोन व्यक्तींच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!