सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्यानुसार, राजस्थानमधील खाटु श्याम मंदिरात गेल्याने लग्न जमतं. महाभारतातील बर्बरीक यांचे रूप असलेले श्यामबाबा भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, अशी श्रद्धा असून देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
'या' देवाला गेल्यामुळं तरुणाचं जमलं लग्न, नाव वाचुन म्हणाल आताच जाऊन उन्हाळ्यातच उरकून टाकणार
सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट व्हायरल होत असून त्यामध्ये राजस्थानमधील खाटु श्याम देवाला गेल्यानंतर लग्न जमतात असं लिहिलं आहे. संबंधित व्यक्तीनं माझं लग्न जमलंच त्यामध्ये सांगितलंय.
27
खाटु श्याम बाबा कोण आहेत?
राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिराला देशभरातून लाखो भक्त भेट देतात. महाभारतातील बर्बरीकाचे हेच रूप श्यामबाबा म्हणून आजही भक्तांच्या मनात भक्तीच्या रूपात जिवंत आहेत.
37
मंदिराला लाखोंच्या संख्येने भाविक देतात भेट
अलीकडच्या दिवसांत मंदिरात रोज हजारो भक्त दर्शनासाठी येत आहेत. खासकरून शनिवार-रविवार आणि एकादशीच्या दिवशी मंदिर परिसरात विशेष गर्दी दिसते. मोठ्या रांगा असूनही भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसतो.
मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी विशेष दर्शन, प्रसाद आणि रांगेतील व्यवस्थेत काही बदल केले आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, बॅरिकेड्स आणि स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
57
खाटू श्याम मेळा – भक्तीचा उत्सव
दरवर्षी आयोजित खाटू श्याम मेळ्यात देशभरातून लाखो श्रद्धाळू सहभागी होतात. भजनी मंडळे, कीर्तन, पालख्या आणि फुलांची सजावट यामुळे संपूर्ण खाटू नगरी भक्तिमय वातावरणाने उजळून निघते.
67
रुणांमध्ये वाढती लोकप्रियता
इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबमुळे खाटू श्यामची कथा आणि भजनं तरुण पिढीतही लोकप्रिय होत आहेत. अनेक तरुण याला इच्छा पूर्ण करणारा देव असं म्हणतात.
77
भक्तांची श्रद्धेवर अढळ आस्था
भक्तांच्या मते, “जो मागे त्याला श्याम देतो” हा विश्वास आजही तितकाच खरा वाटतो. आरोग्य, व्यवसाय, करिअर किंवा मानसिक शांतीसाठी लोक इथे मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात.