मनमोहन सिंग यांच्या अस्थींचे यमुनेत विसर्जन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अस्थी रविवारी दिल्लीत यमुना नदीत विसर्जित करण्यात आल्या. अंत्यसंस्कारावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल गांधी यांनी अंत्यसंस्काराचे ठिकाण निगमबोध घाट असल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अस्थी रविवारी दिल्लीत यमुना नदीत विसर्जित करण्यात आल्या. ‘अस्थी विसर्जन’ साठी गुरुद्वारा मजनू का टीला जवळच्या यमुना घाटावर विधी पार पडला. या प्रसंगी मनमोहन सिंग यांचे कुटुंबीय आणि काही शीख नेते उपस्थित होते. मात्र, गांधी कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हता, तसेच काँग्रेसचा कोणताही मोठा नेता दिसला नाही.

शनिवारी मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार सन्मानासह दिल्लीतील निगमबोध घाटावर करण्यात आले. रविवारी शीख परंपरेनुसार त्यांचे अस्थी विसर्जन झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि कुटुंबातील इतर सदस्य निगमबोध घाटावरून राख आणि अवशेष घेऊन गुरुद्वारा मजनू का टीला येथे आले. येथे शबद कीर्तन, पाठ आणि अरदास करण्यात आले. त्यानंतर अस्थी विसर्जन करण्यात आल्या.

मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावरून राजकारण

मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावर राजकारण सुरू झाले आहे. सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यावरून वाद वाढला आहे. काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर माजी पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की सरकारने केवळ मनमोहन सिंग यांचा नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचाही अनादर केला आहे. त्याचवेळी, भाजपने काँग्रेसवर दु:खाच्या या क्षणाचा राजकीय लाभ घेण्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांची  X (पुर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत टीका

निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की हा माजी पंतप्रधानांचा अपमान आहे. सरकारने त्यांच्याबद्दल आदर दाखवायला हवा होता. त्यांनी X (पुर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आहे की, “भारत मातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करणे सरकारचा सरळ अपमान आहे. एक दशकापर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला. त्यांच्या धोरणांमुळे आजही देशातील गरीब आणि मागास वर्गाला आधार मिळतो. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार अधिकृत समाधी स्थळांवर करण्यात आले, जेणेकरून प्रत्येक नागरिक सहजतेने त्यांच्या दर्शनाला जाऊन श्रद्धांजली वाहू शकेल. डॉ. मनमोहन सिंग हे सर्वोच्च सन्मान आणि समाधी स्थळाचे हकदार आहेत. सरकारने या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल आदर दाखवायला हवा होता.”

जेपी नड्डा म्हणाले, काँग्रेस राजकारण करत आहे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांवरून त्यांच्या मानसिकतेची पातळी किती घृणास्पद आहे, हे दिसून येते. ते अंत्यसंस्कारांवरही राजकारण करत आहेत. याची जितकी निंदा केली जाईल, ती कमीच आहे. केंद्र सरकारने स्मारकासाठी जागा निश्चित केली असून याबाबत त्यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस 'स्वस्त राजकारण' करत आहे.

आणखी वाचा-

पेंगाँग सरोवराच्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही सैन्य दलाची सलामी

Share this article