मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा मार्ग लवकरच होणार खुला, रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Published : Mar 24, 2024, 11:43 AM IST
ashwini vaishnav

सार

भारतामध्ये बुलेट ट्रेनचा प्रकल्प चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर चालू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी भारताचा बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचे काम चांगल्या प्रकारे चालू असल्याची माहिती दिली आहे.

भारतामध्ये बुलेट ट्रेनचा प्रकल्प चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर चालू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी भारताचा बुलेट ट्रेनचा प्रकल्पाचे काम चांगल्या प्रकारे चालू असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या कॉरिडॉरमुळे अर्थव्यवस्था एकत्रित होण्यास मदत होईल असं म्हटलं आहे. 

एका मीडिया इव्हेंटमध्ये बोलत असताना रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, “बुलेट ट्रेन प्रकल्पाकडे अर्थव्यवस्था एकत्रित करण्याच्या दृष्टीकोनातून पाहावं लागणार आहे. भारतीय रेल्वे काम करत असलेल्या पहिल्या कॉरिडॉरमध्ये मुंबई, ठाणे, वापी, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद या सर्व अर्थव्यवस्था एकत्र होण्यास मदत मिळणार आहे. आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात सहजपणे प्रवास करू शकणार आहेत. सुरतमध्ये ब्रेकफास्ट करून आपण मुंबईमध्ये परत येऊ शकता.”

हवाई भाड्यांपेक्षा मेट्रोचा प्रवास स्वस्त असेल का या प्रश्नावर आश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी एनडीटीव्ही इंडियन अवॉर्ड ऑफ द इअर या कार्यक्रमात बोलताना मेट्रो जिथून सुरु झाल्या आहेत. त्या सर्व ठिकाणी 90% प्रवासासाठी त्याचाच वापर केला जाणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई - अहमदबाद हा कॉरिडॉर प्रगती करत असून आठ नद्यानावर पूल बांधण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. 

बुलेट ट्रेनबद्दलची दिली माहिती - 
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम चालू असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. या टप्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भारतातील पहिली बुलेट ट्रेन चालू होईल, अशी माहिती दिली आहे. या मार्गाच्या बांधकामाने वेग घेतला असून लवकर ते पूर्ण होईल अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. या मार्गावरती असणाऱ्या शहरांमधून वेगाने प्रवास करता येणार असून येथे चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 :अमेठी आणि रायबरेलीतुन काँग्रेसला मिळेना उमेदवार? 46 उमेदवारांसह चौथी यादी जाहीर
प्रिय केजरीवाल, तिहार क्लबमध्ये स्वागत आहे; ठग सुकेश चंद्रशेखरचा टोला, म्हणाला- मी केजरीवाल यांच्याविरुद्ध सरकारी साक्षीदार होणार

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!