राजस्थानमध्ये होळीच्या पूर्वीच रंगांची होळी खेळण्याऐवजी रक्तरंजित होळी खेळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.दोन जिल्ह्यातील ७ लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली.यात पाच लोकांची हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राजस्थान: राजस्थानमध्ये होळीच्या पूर्वीच रंगांची होळी खेळण्याऐवजी रक्तरंजित होळी खेळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.दोन जिल्ह्यातील ७ लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली.यात पाच लोकांची हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत निर्माण झाल्याचे चित्र आहे. या संपूर्ण घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे.
हे हत्याकांड माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या झालावाड जिल्ह्यात झाले आहे. याठिकाणी पाच लोकांची हत्या करण्यात आली आहे. तलावांचे शहर असलेले उदयपूर याठिकाणीही दोन लोकांची हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण घटना काळ संध्याकाळ पासून घडल्या आहेत.
पोलीस स्टेशन मध्ये तक्रारीला जातानाच घडले हत्याकांड -
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात काल रात्री पाच जणांची हत्या करण्यात आली. हे सर्व लोक एका पक्षाचे असून त्यांचा दुसऱ्या पक्षाशी वाद होता. हे प्रकरण पगारिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, बिननायका गावात राहणाऱ्या दोन भावांचा त्याच गावात राहणाऱ्या दुसऱ्या पक्षाशी वाद झाला होता. या वादानंतर दोन भाऊ आणि अन्य तीन जण पगारिया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी दोन दुचाकीवरून जात होते. यावेळी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर दुसऱ्या पक्षाने पहिल्या पक्षातील पाच जणांना ट्रकने चिरडले.पाच पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी तैनात आहेत. गावातील परीस्थिती तणाव पूर्ण असल्याने पोलीस याकडे लक्ष देत आहेत तर दुसरीकडे, दुसऱ्या बाजूचे लोक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमध्ये पाच तासांत दोन हत्या-
दुसरीकडे, तलावांचे शहर असलेल्या उदयपूरमध्ये पाच तासांत दोन जणांची हत्या करण्यात आली. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही हत्या ऋषभदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री मसारोच्या ओबारी भागात अनिल नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. अनिल आणि त्याचे दोन मित्र एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतत होते.यातील समोरच्या गटाने त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये अनिल याचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे भरदा भागात दुसरे हत्याकांड घडले. दारूच्या नशेत असलेल्या सुरेश या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा :
Russia : मॉस्को हल्ल्याची जबाबदारी घेणारे ISIS-K कोण आहेत, त्यांनी रशियाला का लक्ष्य केले?
प्रदोष काळात भद्र असल्यामुळे केवळ होळीची पूजा करता येणार, मात्र होळी दहन रात्री ११ नंतर