
पेपरफुटी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक पाऊल उचलली आहेत. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्या समितीचे नाव हाय पावर टास्क फोर्स असं ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येईल असं सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी तरुणाईला आश्वासनं दिलं आहे. भारत सरकार विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कायमच चांगले निर्णय घेत असतं. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला ते आता जेलमध्ये आहेत. या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी आपण फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करणार आहोत.
आता परीक्षा प्रणालीत तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ती या प्रणालीचा अभ्यास करून आवश्यक त्या सूचना करेल. या टास्क फोर्सच्या मदतीने परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.